MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Pune IT Job Scam: सावधान! पुण्यात IT जॉबच्या नावाखाली कोट्यवधींचा 'गेम'; ३,५०० तरुणांची फसवणूक, असे जाळ्यात ओढले जायचे सुशिक्षित बेकार

Pune IT Job Scam: सावधान! पुण्यात IT जॉबच्या नावाखाली कोट्यवधींचा 'गेम'; ३,५०० तरुणांची फसवणूक, असे जाळ्यात ओढले जायचे सुशिक्षित बेकार

Pune IT Job Scam: पुण्यातील हिंजवडी, विमाननगर, बाणेर परिसरात आयटी जॉबच्या नावाखाली एक मोठे रॅकेट उघडकीस आले, ज्यात हजारो तरुणांना कोट्यवधीचा गंडा घातलाय. नोकरीसाठी लाखो रुपये उकळून काही महिने पगार देऊन कंपन्या गायब झाल्याने अनेक तरुण कर्जबाजारी झाले.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 31 2026, 05:19 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
सावधान! पुण्यात IT जॉबच्या नावाखाली कोट्यवधींचा 'गेम'
Image Credit : our own

सावधान! पुण्यात IT जॉबच्या नावाखाली कोट्यवधींचा 'गेम'

पुणे: "चांगल्या कंपनीत नोकरी, ६ ते ११ लाखांचे पॅकेज आणि आयटी क्षेत्रातील करिअर..." या स्वप्नांना भुलून पुण्यातील शेकडो तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. पुण्यातील हिंजवडी, विमाननगर आणि बाणेर परिसरातून चालणाऱ्या एका मोठ्या 'आयटी जॉब रॅकेट'चा पर्दाफाश झाला असून, यामध्ये हजारो सुशिक्षित तरुणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
'पे-फॉर-वर्क'चा असा होता सापळा
Image Credit : our own

'पे-फॉर-वर्क'चा असा होता सापळा

या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे तरुणांना नोकरी देण्यासाठी चक्क १.५ लाख ते ३.५ लाख रुपयांपर्यंतची लाच मागितली जात होती. सृष्टी (नाव बदलले आहे) नावाच्या एका तरुणीने ११ लाखांच्या पॅकेजसाठी ३.२५ लाख रुपये भरले. तिला महिनाभर पगार मिळाला, पण त्यानंतर कंपनी गायब झाली. सृष्टीसारखे शेकडो तरुण आता पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहेत. 

Related Articles

Related image1
Ration Card: रेशन कार्ड बंद पडलंय? टेन्शन सोडा! आता घरबसल्या मोबाईलवर करा 'चुटकीसरशी' सुरू; जाणून घ्या सोपी प्रोसेस
Related image2
Khadki To Indore Special Train: पुणेकरांसाठी गूड न्यूज! खडकी-इंदूर स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या; उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची चंगळ, पाहा नवे वेळापत्रक
37
या कंपन्यांवर ओढावली कारवाई
Image Credit : Getty

या कंपन्यांवर ओढावली कारवाई

पुणे पोलिसांनी आतापर्यंत अनेक कंपन्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले असून मुख्य सूत्रधार अटकेत आहेत.

Flynaut SaaS (हिंजवडी): या कंपनीवर तब्बल ३५४ एफआयआर दाखल झाले असून ६ कोटींची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे.

QuantumSoft (विमाननगर): इथे १०० हून अधिक तक्रारी आल्या असून ८०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला आहे.

DataTech Labs (बावधन): पगार न देणे आणि कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे आरोप या कंपनीवर आहेत. 

47
फसवणुकीची कार्यपद्धती (Modus Operandi)
Image Credit : Getty

फसवणुकीची कार्यपद्धती (Modus Operandi)

१. फेक कन्सल्टंट: जॉब पोर्टलवरून डेटा चोरून कन्सल्टंट तरुणांना कॉल करायचे.

२. पॅकेजचे आमिष: ६ लाखांच्या पॅकेजसाठी २.५ लाख आणि ११ लाखांच्या पॅकेजसाठी ३.२५ लाख अशी 'रेट लिस्ट'च तयार होती.

३. दोन महिन्यांचा पगार: विश्वास संपादन करण्यासाठी पहिले १-२ महिने पगार दिला जायचा, त्यानंतर पगार बंद आणि संपर्काचे सर्व मार्ग ब्लॉक!

४. टार्गेट: प्रामुख्याने यवतमाळ, अमरावती, नागपूर आणि अहमदनगर सारख्या छोट्या शहरांतील मध्यमवर्गीय तरुण या रॅकेटचे बळी ठरले. 

57
दागिने विकले, कर्ज काढले... पण हाती काय?
Image Credit : Getty

दागिने विकले, कर्ज काढले... पण हाती काय?

अनेक तरुणांनी नोकरीसाठी शेती गहाण ठेवली, आईचे दागिने विकले तर काहींनी चढ्या व्याजाने कर्ज काढले. आता नोकरीही गेली आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. विशेष म्हणजे, या कंपन्यांनी दिलेली अनुभवाची प्रमाणपत्रे (Experience Letters) बनावट ठरल्याने इतर कंपन्यांमध्येही या तरुणांना नोकरी मिळवणे कठीण झाले आहे. 

67
सरकारचे कडक पाऊल
Image Credit : Getty

सरकारचे कडक पाऊल

या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने SIT (विशेष तपास पथक) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आयटी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निवारण्यासाठी स्वतंत्र लवाद (Tribunal) स्थापन करण्याची घोषणा गृहविभागाने केली आहे. 

77
आयटी कर्मचारी युनियनचा (FITE) इशारा
Image Credit : Getty

आयटी कर्मचारी युनियनचा (FITE) इशारा

"केवळ कंपन्यांच्या मालकांना अटक करून चालणार नाही, तर या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या ३० हून अधिक कन्सल्टंटचा शोध घेऊन त्यांचे आर्थिक व्यवहार तपासले पाहिजेत."

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
पुण्याच्या बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Recommended image2
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Recommended image3
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'
Recommended image4
Sangli Waste Plant : प्रदूषणाच्या तक्रारींनंतर सांगलीतील 10 मेगावॅटचा वीज प्रकल्प बंद
Recommended image5
MPSC Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांचा पाठिंबा, सरकारला दिला इशारा
Related Stories
Recommended image1
Ration Card: रेशन कार्ड बंद पडलंय? टेन्शन सोडा! आता घरबसल्या मोबाईलवर करा 'चुटकीसरशी' सुरू; जाणून घ्या सोपी प्रोसेस
Recommended image2
Khadki To Indore Special Train: पुणेकरांसाठी गूड न्यूज! खडकी-इंदूर स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या; उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची चंगळ, पाहा नवे वेळापत्रक
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved