MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Khadki To Indore Special Train: पुणेकरांसाठी गूड न्यूज! खडकी-इंदूर स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या; उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची चंगळ, पाहा नवे वेळापत्रक

Khadki To Indore Special Train: पुणेकरांसाठी गूड न्यूज! खडकी-इंदूर स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या; उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची चंगळ, पाहा नवे वेळापत्रक

Khadki To Indore Special Train: उन्हाळी सुट्ट्यांत गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने खडकी ते इंदूर दरम्यान साप्ताहिक 'ट्रेन ऑन डिमांड' स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला. या वाढीव फेऱ्या २ एप्रिल २०२६ ते ३० जुलै २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 31 2026, 03:53 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
पुणेकरांसाठी गूड न्यूज! खडकी इंदूर स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या
Image Credit : social media

पुणेकरांसाठी गूड न्यूज! खडकी-इंदूर स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या

पुणे: उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची होणारी तुफान गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील खडकी ते इंदूर दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक 'ट्रेन ऑन डिमांड' (TOD) स्पेशल ट्रेनच्या कालावधीत मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळे पर्यटनासाठी किंवा गावी जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
कसे असेल नवीन वेळापत्रक?
Image Credit : Social Media

कसे असेल नवीन वेळापत्रक?

खडकी-इंदूर-खडकी ही विशेष गाडी पूर्वीच्याच थांब्यांवर आणि वेळेनुसार धावणार आहे. बदललेला कालावधी खालीलप्रमाणे आहे.

खडकी - इंदूर साप्ताहिक विशेष (गाडी क्र. ०९३२३): ही गाडी दर गुरुवारी धावते. पूर्वी ही सेवा २६ मार्च २०२६ पर्यंतच होती, मात्र आता ती वाढवून २ एप्रिल २०२६ ते ३० जुलै २०२६ पर्यंत करण्यात आली आहे.

इंदूर - खडकी साप्ताहिक विशेष (गाडी क्र. ०९३२४): परतीच्या प्रवासासाठी दर बुधवारी सुटणारी ही गाडी आता २९ जुलै २०२६ पर्यंत धावणार आहे. 

Related Articles

Related image1
Ration Card: रेशन कार्ड बंद पडलंय? टेन्शन सोडा! आता घरबसल्या मोबाईलवर करा 'चुटकीसरशी' सुरू; जाणून घ्या सोपी प्रोसेस
Related image2
WhatsApp Update: आता लांबलचक चॅट वाचायची गरज नाही, WhatsApp आणतंय भन्नाट फीचर!
35
बुकिंग कधीपासून सुरू होणार?
Image Credit : South Western Railways - SWR

बुकिंग कधीपासून सुरू होणार?

प्रवाशांना नियोजित प्रवासासाठी आरक्षण (Reservation) करणे सोपे जावे यासाठी रेल्वेने तारखा जाहीर केल्या आहेत.

आरक्षण: गाडी क्रमांक ०९३२३ च्या वाढीव फेऱ्यांसाठी ३१ मार्च २०२६ पासून बुकिंग सुरू होईल.

कुठे कराल बुकिंग? प्रवासी सर्व अधिकृत संगणकीकृत PRS केंद्रांवरून किंवा IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवरून तिकीट बुक करू शकतात.

अनारक्षित डबे (General Ticket): ज्यांना जनरल डब्यातून प्रवास करायचा आहे, ते UTS ॲप किंवा तिकीट खिडकीवरून तिकीट घेऊ शकतात. या गाड्यांसाठी सुपरफास्ट मेल किंवा एक्सप्रेसचे नेहमीचे शुल्क लागू असेल. 

45
का घेतला हा निर्णय?
Image Credit : South Western Railways - SWR

का घेतला हा निर्णय?

मार्च ते जुलै या कालावधीत शाळा-कॉलेजला सुट्ट्या असल्याने इंदूर आणि मध्य प्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. नियमित गाड्यांमधील वेटिंग लिस्ट कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना 'कन्फर्म' सीट मिळावी यासाठी रेल्वेने या 'स्पेशल' फेऱ्या वाढवल्या आहेत. 

55
उन्हाळी सुट्टीत इंदूरला जात असाल तर वाढीव फेऱ्या सुवर्णसंधी
Image Credit : iSTOCK

उन्हाळी सुट्टीत इंदूरला जात असाल तर वाढीव फेऱ्या सुवर्णसंधी

जर तुम्ही उन्हाळी सुट्टीत इंदूरला जाण्याचा बेत आखत असाल, तर या वाढीव फेऱ्या तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहेत. ३१ मार्चला सकाळीच आपले आरक्षण करून टाका!

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या
पुण्याच्या बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Recommended image2
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Recommended image3
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'
Recommended image4
Sangli Waste Plant : प्रदूषणाच्या तक्रारींनंतर सांगलीतील 10 मेगावॅटचा वीज प्रकल्प बंद
Recommended image5
MPSC Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांचा पाठिंबा, सरकारला दिला इशारा
Related Stories
Recommended image1
Ration Card: रेशन कार्ड बंद पडलंय? टेन्शन सोडा! आता घरबसल्या मोबाईलवर करा 'चुटकीसरशी' सुरू; जाणून घ्या सोपी प्रोसेस
Recommended image2
WhatsApp Update: आता लांबलचक चॅट वाचायची गरज नाही, WhatsApp आणतंय भन्नाट फीचर!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved