सार
Pune Bus Rape Case : पुण्यात एका 26 वर्षीय तरुणीवर स्वारगेट बस स्थानकात बलात्कार करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. प्रकरणातील आरोपीच्या विरोधात आधीपासूनच काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
Who is Dattatraya Ramdas Gade : पुण्यातील सर्वाधिक गर्दी आणि दाटीवाटी असणाऱ्या स्वारगेट बस स्थानकात 25 फेब्रुवारीला एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याशिवाय विरोधकांकडून महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. सध्या घटनेतील आरोपीची ओखळ पटली असून दत्तात्रेय रामदास गाडे असे त्याचे नाव आहे. आरोपीने घटनेनंतर घटनास्थळावरुन पळ काढला आहे. आरोपीचा कसून शोध घेतला जात असून आता त्याच्यावर बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. खरंतर, दत्तात्रेय रामदास गाडे वर्ष 2019 पासून जामीनावर बाहेर असून त्याच्यावर आधीच काही गुन्हे दाखल असल्याची मोठी माहिती देखील समोर आली आहे. जाणून घेऊया नक्की कोण आहे दत्तात्रेय रामदास गाडे याबद्दल सविस्तर...
कोण आहे दत्तात्रेय रामदास गाडे?
- स्वारगेट पोलीस स्थानकातील एका अधिकाऱ्यांनुसार, दत्तात्रेय रामदास गाडे याच्या विरोधात पुणे आणि आसपासच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चोरी, चैन चोरी अशा काही घटनांबद्दल अर्धा डझन गुन्हे दाखल आहेत.
- पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गाडे वर्ष 2019 पासून जामीनावर बाहेर आहे.
- वर्ष 2024 मध्ये दत्तात्रेय गाडेच्या विरोधात पुण्यात चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी त्याला पोलीस स्थानकात बोलावण्यात आले होते.
नक्की काय घडले?
पीडित तरुणी मंगळवारी (25 फेब्रुवारी) सकाळी 5.45 मिनिटांनी फलटण, साताऱ्यासाठी जाणाऱ्या बसची वाट पाहत होते. त्यावेळी एक व्यक्ती तिच्याकडे येत तिला ताई म्हणाला. या व्यक्तीने साताऱ्यासाठीची बस दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आली असल्याचे म्हटले. यानंतर आरोपीने पीडित तरुणीला शिवशाही एसी बसमध्ये नेले. बसमधील लाईट्स बंद होत्या. पीडित तरुणी बसमध्ये चढण्यास घाबरत होती तरीही आरोपीने तिला चढण्यास सांगितले आणि त्याचवेळी बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला.
आणखी वाचा :
धक्कादायक! पुण्यात शासकीय बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीवर 1 लाखांचे बक्षीस जाहीर