राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेनंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना आव्हान दिले आहे. प्रकाश महाजन यांनीही दुबेंना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनीही दुबेंना मुंबईत येण्याचे आव्हान दिले आहे.
Maharashtra: मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रमुख भूमिका घेतली आहे. यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना आव्हान दिल आहे. आपल्या घरात कोणीही सिंह असतो. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ...महाराष्ट्र बाहेर या, तुम्हाला पटकून पटकून मारु, असं निशिकांत दुबे यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले प्रकाश महाजन? -
राज ठाकरे आमचे सेनापती आहेत. मी त्याच्या एक पाऊल पुढे गेलो आहे. दिन तुम्हारा, बताओ कहाँ... हवं असल्यास झारखंडलाही येतो, असे आव्हान त्यांनी निशिकांत दुबेंना दिले आहे. ते पुढे म्हणाले की, मराठी कुठे गेले नाही. अफगाण आम्हाला भीत होतं आणि हा शहाणा सांगतोय की, राज ठाकरेंना मी हिंदी शिकवतो. अरे राज ठाकरेंच्या वडिलांनी मोहम्मद रफीकडून मराठी गाणे गाऊन घेतले आहेत.
आमच्याकडे कावळा देखील मराठीत बोलतो. माझं नशीब आहे की, प्रत्येक भाजपा खासदाराला मला आव्हान द्यावे लागते. मुख्यमंत्री काहीही बोलत नाही, त्यांना समज देत नाहीत, असं महाजन यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्यासारख्या प्रवृत्तीला शिक्षा मिळावी असं वक्तव्य मनोज तिवारी यांनी केलं होत. त्यावर बोलतांना महाजन यांनी तो नाच्या. तू लाव तुझा सिनेमा मुंबईत मग दाखवतो. भाजपने असले लोक आमच्यावर सोडू नये. त्यांना हिंदूंमध्ये फूट पाडायची आहे, असं म्हटलं आहे.
राज ठाकरे काय म्हणाले होते? -
दुबे नावाचा कोणीतरी भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणाला, मराठी लोकांना आम्ही पटकून पटकून मारु. त्याच्यावर केस झाली का? हिंदी चॅनेल वाल्यांनी त्याचं चालवलं का? त्याचं वक्तव्य दाखवलं का? काहीही नाही. बघा हे कसे असतात. तू आम्हाला पटक पटकके मारणार? दुबेला मी सांगतो...दुबे..तुम मुंबई में आ जावो...मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे..., असं राज यांनी म्हटलं आहे.
