Pune Metro Phase-2: पुणे मेट्रो प्रकल्पाच्या फेज-२ ला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. या अंतर्गत वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी असे दोन नवीन मार्ग बांधले जातील.
पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पुणे मेट्रो प्रकल्पाच्या फेज-२ ला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता पुण्याच्या वेगाने वाढणाऱ्या उपनगरांनाही मेट्रोचा थेट लाभ मिळणार आहे.
दोन नवीन मेट्रो कॉरिडॉर
फेज-२ अंतर्गत दोन उन्नत मेट्रो मार्गांचा समावेश आहे.
मार्ग 2A: वणजे ते चांदणी चौक
मार्ग 2B: रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी
हे मार्ग फेज-१ मधील वनाज–रामवाडी मार्गाचा विस्तार असणार असून, पुण्याच्या पूर्व-पश्चिम दिशेतील वाहतूक व्यवस्था सशक्त करणारे ठरणार आहेत.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये एका नजरेत
घटक तपशील
एकूण लांबी 12.75 किमी
एकूण स्थानके 13
प्रमुख भाग चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी, वाघोली
पूर्णत्व कालावधी 4 वर्षे
एकूण खर्च ₹3,626.24 कोटी
वित्तीय भागीदारी केंद्र, राज्य सरकार व आंतरराष्ट्रीय संस्था
इंटरचेंज सुविधा आणि मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी
हा प्रकल्प लाइन-1 (निगडी–कात्रज) आणि लाइन-3 (हिंजवडी–डिस्ट्रिक्ट कोर्ट) या दोन प्रमुख मार्गांशी ‘डिस्ट्रिक्ट कोर्ट इंटरचेंज’ स्थानकावर जोडला जाणार आहे. यामुळे प्रवाशांना seamless आणि एकात्मिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
आंतरशहरी बससेवांचा समावेश
फेज-२ मध्ये इंटरसिटी बससेवांनाही मेट्रोशी जोडण्याची योजना आखण्यात आली आहे:
चांदणी चौक: मुंबई, बेंगळुरू येथून येणाऱ्या बसेस
वाघोली: छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर येथून येणाऱ्या बसेस
प्रवाशांची अपेक्षित वाढ
वर्ष प्रवाशांची संख्या (दिवसाला)
2027 96,000
2037 2.01 लाख
2047 2.87 लाख
2057 3.49 लाख
प्रकल्पाचे लाभ
आयटी हब, शैक्षणिक संस्था आणि व्यापारी वसाहतींना थेट मेट्रो जोडणी
सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढणार
नगर रोड, पौड रोडसारख्या प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कमी
प्रदूषणविरहित, वेगवान आणि सुरक्षित प्रवास
शहरी आणि आर्थिक विकासाला चालना
अंमलबजावणी आणि पुढील पावले
महामेट्रो (MAHA-METRO) ही अंमलबजावणी संस्था असून, नागरी, इलेक्ट्रो-मेकॅनिकल व संबंधित सर्व कामांची जबाबदारी हीच संस्था पार पाडणार आहे. पूर्व-निर्माण कामांना सुरुवात झाली आहे आणि संपूर्ण प्रकल्प ४ वर्षांत पूर्ण होण्याचा मानस आहे.
पुणेचा मेट्रो प्रवास आता अधिक व्यापक आणि प्रगत
या निर्णयामुळे पुणे मेट्रो केवळ शहरापुरती मर्यादित राहणार नाही, तर तिचा विस्तार आता पुण्याच्या उपनगरांपर्यंत होणार आहे. सुरक्षित, गतिमान आणि पर्यावरणपूरक वाहतुकीकडे वाटचाल करणाऱ्या पुणेकरांसाठी ही खरी "रेल" बातमी आहे!


