सार

पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांना तिकीट नाकारल्यानंतर ते बेपत्ता होते. ३६ तासांनी ते घरी परतले असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीनिवास वनगा यांचे तिकीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तिकीट नाकारण्यात आले. त्यांच्या ऐवजी राजेंद्र गावित यांना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे श्रीनिवास वनगा हे गायब झाले होते. सोमवारी रात्रीपासून ते नॉट रिचेबल झाले होते पण अखेर ३६ तासांपासून श्रीनिवास यांच्याशी संपर्क झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. 

श्रीनिवास वनगा आले घरी - 
श्रीनिवास हे त्यांच्या घरी परत आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. त्यांची प्रकृती ठीक असून ते व्यवस्थित असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावेळी सुमन वनगा यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे. त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे की, परवा रात्रीपासून पोलिसांनी खूप शोधाशोध केली. सर्वजण खूप काळजी करत होते. मुख्यमंत्र्यांनीही फोन केला होता. यानंतर ते (श्रीनिवास वनगा) रात्री घरी आले. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आराम करत आहेत. त्यांना आराम करायचा होता, त्यामुळे ते सध्या विश्रांती घेत आहेत. त्यांनी कुठे आहेत, याची काहीही माहिती दिली नाही. पण त्यांच्यासोबत काही जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी घरी कधी येणार याबद्दल काहीही सांगितलेलं नाही”. 

श्रीनिवास वनगा यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे देवमाणूस होता आणि आम्ही घातकी माणसासोबत आलो अशीही कबुली दिली.