महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयात एकनाथ शिंदे सरकारच्या पाच योजनांचा मोठा वाटा होता. यामध्ये "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना", "बटेंगे तो कटेंगे" सारख्या घोषणा आणि इतर विकास योजनांचा समावेश आहे.
Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्रात महायुतीचा विधानसभेतील निवडणुकीत मोठा विजय होताना दिसून येत आहे. यावरच देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीपद कोण भूषवणार याची उत्सुकता आहे. निकालानंतर महायुतीतील घटकपक्ष चर्चा करून निर्णय घेणार आहेत.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने अभूतपूर्व विजय मिळवलाय. या विजयामुळे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व अधिक मजबूत झाले असून, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाला आहे. फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपाने रेकॉर्डब्रेक जागा जिंकल्यात.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निकालांमध्ये काहीतरी गडबड झाली असल्याचा आरोप करत, हा महाराष्ट्राच्या जनतेचा निर्णय नसल्याचे ते म्हणाले.
महाविकास आघाडीच्या २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवाची १० प्रमुख कारणे उलगडली आहेत. नेत्यांमधील असंतोष, गटबाजी, विरोधी पक्षांची कमी लोकप्रियता, उद्धव ठाकरे गटाची पक्षाची हानी, पक्षांची ताकद कमी होणे ही काही प्रमुख कारणे आहेत.
महाराष्ट्रातील सत्तास्थान असलेल्या महायुतीला विकास कामांबरोबरच भाजपाची ताकद, शिंदे गटाची एकजूट, आणि केंद्राच्या योजनांचा लाभ यामुळे फायदा होत आहे. विरोधी पक्षांचा विखुरलेला पणा, मतदारांचा विश्वास, स्थिर सरकार यामुळे महायुतीला बळकटी मिळत आहे.
महाविकास आघाडीमध्ये असलेल्या पक्षांमध्ये कायम असलेल्या गटबाजी आणि अंतर्गत संघर्षांमुळे एकात्मता साधता आलेली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रियतेत घट झाली. आदी कारणांमुळे महाविकास आघाडीला निवडणुकीत मोठा फटका बसला आहे.