MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Weather Alert: पाऊस अजून गेला नाही! राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather Alert: पाऊस अजून गेला नाही! राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने १५ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील अनेक भागांत पुन्हा पावसाचा इशारा दिलाय. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील एकूण २३ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Oct 14 2025, 09:43 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
पावसाची पुन्हा राज्यात एन्ट्री!
Image Credit : Getty

पावसाची पुन्हा राज्यात एन्ट्री!

मुंबई: राज्यात काही दिवस उन्हाळी वातावरणानंतर पुन्हा एकदा पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. येत्या १५ ऑक्टोबर रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे एकूण २३ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Thunderstorm accompanied with lightning , light to moderate rain , gusty winds 30 -40 kmph very likely to occur at isolated places over South Madhya Maharashtra and Marathwada.

तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/PxvBkKEaVc

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 14, 2025 

27
कोकण विभाग
Image Credit : social media

कोकण विभाग

मुंबई आणि पालघरमध्ये वातावरण कोरडे राहणार आहे.

ठाणे आणि रायगडमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने यलो अलर्ट जारी. 

Related Articles

Related image1
Ladki Bahin Yojana: ई-केवायसीबाबत मोठी घोषणा, अदिती तटकरे काय म्हणाल्या?; जाणून घ्या
Related image2
Maharashtra Cabinet Decisions: शेतकरी, विद्यार्थी आणि न्यायव्यवस्थेसाठी मंत्रिमंडळाचे ३ महत्त्वाचे निर्णय!
37
पश्चिम महाराष्ट्र
Image Credit : Getty

पश्चिम महाराष्ट्र

पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता.

घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता.

संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट. 

47
मराठवाडा
Image Credit : ANI

मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा.

विजांच्या कडकडाटामुळे सतर्कतेचा सल्ला. 

57
उत्तर महाराष्ट्र
Image Credit : Asianet News

उत्तर महाराष्ट्र

धुळे आणि नंदुरबारमध्ये वातावरण कोरडे राहण्याची शक्यता.

नाशिक आणि जळगावमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता.

अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा; यलो अलर्ट. 

67
विदर्भ
Image Credit : ANI

विदर्भ

अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट अपेक्षित; यलो अलर्ट.

नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत वातावरण कोरडे राहण्याची शक्यता.

77
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा
Image Credit : ANI

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा

शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. हवामानात होणाऱ्या अचानक बदलांमुळे नागरिकांनीही आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाचा परतीचा मोसम सुरू असून, हा पाऊस शेवटचा की पुन्हा काहीतरी अनपेक्षित घडणार? हवामान खात्याच्या पुढील अपडेट्सकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या
मुंबई बातम्या
पुण्याच्या बातम्या
विदर्भातील बातम्या
नाशिक बातम्या
कोल्हापूर बातम्या
छ. संभाजीनगर बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर टँकर अपघातानंतरही कोंडी कायम; 32 तासांचा हाहाकार, सरकारकडून चौकशीचे आदेश
Recommended image2
Ration Card: रेशन कार्डमधून नाव कट झालंय? टेन्शन सोडा, ५ मिनिटांत घरबसल्या करा नवीन नोंदणी!
Recommended image3
Solapur ZP Election : मोहोळमध्ये शिंदेंचं धक्कादायक वक्तव्य; शिवसेनेच्या चिन्हावरील उमेदवारालाच मत देऊ नका!
Recommended image4
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत धक्कादायक प्रकार; नंदुरबारमध्ये 710 पुरुषांचे अर्ज बाद
Recommended image5
Mumbai Pune Expressway : 32 तासांनंतर अपघातग्रस्त गॅस टँकर हटवण्यात यश; मुंबई–पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीत
Related Stories
Recommended image1
Ladki Bahin Yojana: ई-केवायसीबाबत मोठी घोषणा, अदिती तटकरे काय म्हणाल्या?; जाणून घ्या
Recommended image2
Maharashtra Cabinet Decisions: शेतकरी, विद्यार्थी आणि न्यायव्यवस्थेसाठी मंत्रिमंडळाचे ३ महत्त्वाचे निर्णय!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved