केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुस्लिमांना आरक्षण देणार नाही, अशी घोषणा केली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गांसाठी असलेले आरक्षण कमी न करता मुस्लिमांना आरक्षण देणे शक्य नाही, असे ते म्हणाले.
सोलापूरमध्ये प्रचारसभेत असदुद्दीन ओवेसी यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ओवेसींनी यावर आक्षेप घेतला असून आचारसंहितेच्या काळात पोलिस नोटीस कशी पाठवू शकतात, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सामानाची तपासणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केली. शिंदे यांनी यावेळी केलेल्या विनोदाचा रोख उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याचे बोलले जाते.
२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट सरकार कोणते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.