महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जागावाटप झाल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये नवी समीकरणे निर्माण झाली आहेत. भाजप सर्वाधिक जागा लढवत असून, शिवसेना (यूबीटी) ला सर्वाधिक फटका बसला आहे. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची जास्त जागा जिंकणाऱ्या पक्षाला मिळणार आहे.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली आहे. त्यांना ताप, अशक्तपणा आणि इन्फेक्शनचा त्रास जाणवत असून, डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. याचा परिणाम विधानसभा निवडणुका आणि मराठा आरक्षणाच्या लढाईवर होऊ शकतो.
फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा नसल्याचे स्पष्ट केले. ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याचा अनुभव असल्याने आता कोणतीही जबाबदारी स्वीकारायला ते तयार आहेत. महाविकास आघाडीवर टीका करताना त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवारांची गरज नसल्याचेही सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या नामांकनाच्या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरचा संभ्रम कायम राहिला, तर बारामतीत शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील शाब्दिक युद्ध सुरूच राहिले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमधील जागावाटपाची चित्र स्पष्ट झाली आहे. भाजप 148 जागांवर उमेदवार उतरवणार आहे.
Maharashtra Elections 2024 : बारामतीत शरद पवारांनी अजित पवारांच्या रडण्याची नक्कल केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. अजित पवारांनी यावर नाराजी व्यक्त केली असून, ही नक्कल अनेकांना आवडली नसल्याचे म्हटले आहे.