MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट! सोमवारी 22 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, IMD कडून येलो अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट! सोमवारी 22 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, IMD कडून येलो अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert: हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला. सोमवार, 27 ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Oct 26 2025, 09:29 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
सोमवारी 22 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा
Image Credit : Getty

सोमवारी 22 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा

मुंबई: राज्यातील हवामान पुन्हा एकदा अस्थिर झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर आता पुन्हा वादळी पावसाचे अस्मानी संकट ओढवण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 22 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. 27 ऑक्टोबर (सोमवार) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

Thunderstorm accompanied with lightning, heavy rainfall, gusty winds with speed reaching 40-50 Kmph very likely to occur at isolated places in the districts of Konkan-Goa and North Madhya Maharashtra.

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 26, 2025

27
कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज
Image Credit : Asianet News

कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज

कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा पावसाचे जोरदार आगमन होणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड येथे विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मात्र मुसळधार पाऊस आणि वीजांसह वादळाचा इशारा दिला आहे. या सर्व जिल्ह्यांना IMD ने येलो अलर्ट जारी केला आहे. 

Related Articles

Related image1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगे-पाटलांना 'मैत्री'चा थेट प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी आता मिटवूयात..."
Related image2
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, ठाणे-जळगावसह काही जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट
37
मराठवाड्यातही पावसाची शक्यता
Image Credit : Getty

मराठवाड्यातही पावसाची शक्यता

छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज आहे. तर जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. 

47
उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, वादळी वारे
Image Credit : Getty

उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, वादळी वारे

धुळे, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहमदनगर जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडेल. जळगाव जिल्ह्यांतही अधूनमधून पावसाची शक्यता आहे. 

57
विदर्भात काही भागांत पावसाची शक्यता
Image Credit : ANI

विदर्भात काही भागांत पावसाची शक्यता

अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांत हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याचा अंदाज आहे. मात्र चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या तिन्ही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

67
IMD चं आवाहन, नागरिकांनी घ्यावी काळजी
Image Credit : Asianet News

IMD चं आवाहन, नागरिकांनी घ्यावी काळजी

राज्यात अनेक भागांत 27 ऑक्टोबर रोजी वादळी पाऊस, विजा आणि वारे यांचा जोर अपेक्षित असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विजांचा कडकडाट होत असताना उघड्यावर जाणे टाळावे.

पावसाळी हवामानात सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.

शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. 

77
IMD चं आवाहन, नागरिकांनी घ्यावी काळजी
Image Credit : Getty

IMD चं आवाहन, नागरिकांनी घ्यावी काळजी

राज्यात अनेक भागांत 27 ऑक्टोबर रोजी वादळी पाऊस, विजा आणि वारे यांचा जोर अपेक्षित असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विजांचा कडकडाट होत असताना उघड्यावर जाणे टाळावे.

पावसाळी हवामानात सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.

शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. 

महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी पावसाची हजेरी अपेक्षित असून, 22 जिल्ह्यांना IMD कडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण ते मराठवाड्यापर्यंत हवामान अस्थिर राहणार असल्याने पुढील काही दिवस नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या
मुंबई बातम्या
पुण्याच्या बातम्या
विदर्भातील बातम्या
नाशिक बातम्या
कोल्हापूर बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maharashtra Weather Update: पुढील २४ तास महत्त्वाचे! 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; कडक उन्हात अवकाळीची एन्ट्री
Recommended image2
Rain Alert: विदर्भावर अवकाळीचे सावट! पुढील ३ तास अत्यंत महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Recommended image3
SSC बोर्डाचा पेपर की चौथीची चाचणी? दहावीच्या मराठी प्रश्नपत्रिकेतील 'अतिसोप्या' प्रश्नांमुळे शिक्षणतज्ज्ञ संतापले!
Recommended image4
CIDCO Lottery: नवी मुंबईत हक्काचं घर! सिडको लॉटरीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज; जाणून घ्या सोप्या स्टेप्स
Recommended image5
कोकणवारी आता सुपरफास्ट! मुंबई-सिंधुदुर्ग 'रो-रो' फेरी सुरू होणार; ६ तासांत प्रवास अन् सोबतीला स्वतःची गाडी!
Related Stories
Recommended image1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगे-पाटलांना 'मैत्री'चा थेट प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी आता मिटवूयात..."
Recommended image2
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, ठाणे-जळगावसह काही जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved