Sharad Pawar on Pahalgam Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राकांपा) प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे की या घटनेला धार्मिक रंग देणे देशासाठी "हानिकारक" आहे.
नांदेडच्या भोसी गावातील सुमनबाई गायकवाड यांनी पिकवलेला 'मियाझाकी' आंबा सध्या चर्चेचा विषय आहे. ₹10,000 प्रति आंबा या दराने विकला जाणारा हा आंबा त्यांच्या संघर्ष आणि चिकाटीचे प्रतीक आहे.
Pune : पुणे येथील विमानगर परिसरात असणाऱ्या खासगी कंपनीच्या महिलांच्या वॉशरुममध्ये एक 25 वर्षीय तरुण डोकावून पाहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सदर तरुणीला पोलिसांच्या ताब्यात दिली आहे.
अंबाला गावातील आदिवासी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात जेवणानंतर २८९ जणांना विषबाधा झाली. या दुर्घटनेत एका ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून, अनेक जणांवर उपचार सुरू आहेत.
Accident in Satara : सातारा-सज्जनगड येथे दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा अपघात होत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील पिकअप चालकावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त चोंडी येथे होणारी मंत्रिमंडळ बैठक ६ मे २०२५ रोजी होणार आहे. या बैठकीत विविध विकास प्रकल्पांवर चर्चा होणार असून, जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.
Mango Success Story: तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडीच्या शेतकरी सुदर्शन जाधव यांनी द्राक्षबागेच्या बांधावर केशर आंब्याची लागवड करून तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. त्यांनी वापरलेल्या तंत्रज्ञानामुळे आणि कुटुंबाच्या सहकार्यामुळे त्यांना हे यश मिळाले.
मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरातील कैसर-इ-हिंद इमारतीत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात रविवारी आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याच्या वृत्ताला खोटे ठरवले आहे. अशी दिशाभूल करणारी माहिती पसरवू नये असा इशारा दिला. सर्व पाकिस्तानी नागरिकांचा शोध लागला असून त्यांना देशाबाहेर पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात प्रेमविवाहाच्या रागातून एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या मुलीची गोळी मारून हत्या केली. लग्नाच्या कार्यक्रमात झालेल्या या गोळीबारात जावई गंभीर जखमी झाला आहे.
Maharashtra