उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी आजच्या पावसाने काहीसा दिलासा दिला, मात्र त्याचबरोबर शहरात वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या हालअपेष्टांनाही कारणीभूत ठरला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रित येण्याच्या मुद्द्यावर भाष्य केल्याने चर्चा रंगल्या होत्या. आता उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासोबत जाण्यास तयार असून पण राज यांनी यावर मौन बाळगले आहे.
बुलढाण्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
हवामान विभागाने मुंबईसह कोकणात पुढील दोन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी, मच्छीमार आणि प्रवाशांनी विशेष खबरदारी घ्यावी.
ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या २,४६७ कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणात ईडीने कुटे ग्रुपच्या १८८ कोटींच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. यात जमीन, इमारती, औद्योगिक प्लांट आणि यंत्रसामग्रीचा समावेश आहे.
नागपूरजवळील कुही तालुक्यातील सुरगाव येथील एका खदानीत एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आले. मृतांमध्ये दोन महिला, दोन मुले आणि एक पुरुष आहेत. ते रविवारी फिरायला गेले होते आणि बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.
अवघ्या १८ वर्षांच्या कोमल भरत जाधव या तरुणीची तिच्या राहत्या परिसरातच भररस्त्यात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे, या घटनेत तिच्याच शेजाऱ्याचा हात असल्याचे उघडकीस आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) आज १३ मे रोजी १०वीचा निकाल जाहीर करणार आहे. १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, निकाल हा केवळ आकड्यांची गोष्ट नसून विद्यार्थी, पालक आणि स्पर्धेच्या चाहुलीचा संगम आहे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानला दिलेल्या योग्य उत्तराबद्दल सैन्य दलांचे आभार मानले आहेत. मुंबई हे आर्थिक केंद्र असल्याने राज्य सरकारला सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
India-Pakistan Tensions : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी संरक्षण दल आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली.
Maharashtra