विदर्भातील अकोल्यात जन्मलेला आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारा साहिल इंगळे याने साकारलेला ‘अ डॉल मेड अप ऑफ क्ले’ हा लघुपट आता थेट जगप्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवात (Cannes Film Festival) झळकणार आहे.
3 मार्च रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृहातून सांगली जिल्हा कारागृहात हलवताना गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला पोलिस व्हॅनमध्ये मटण बिर्याणी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) ने बस भाड्यांमध्ये वाढ केली आहे, ज्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. पहिल्या टप्प्याचे भाडे ₹१०, दैनिक पास ₹७० आणि मासिक पास ₹१५०० झाले आहेत. प्रवाशांनी सेवेची गुणवत्ता सुधारण्याची मागणी केली आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांची आज १४ मे रोजी जयंती आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा शौर्यशील स्वभाव, निर्भय नेतृत्व आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान मराठा इतिहासात अजरामर आहे.
पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची पुन्हा एकदा निवड केली आहे. पक्षाने राज्यभरातील ५८ शहर जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली असून, पुण्यात घाटे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी राजीनामा दिला आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने राजकीय बदनामी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे राष्ट्रवादीला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करणारे आमदार अतुल भोसले यांची भाजपने सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. लोकसभा निवडणुकीतील यशस्वी कामगिरी आणि संघटनात्मक कौशल्यामुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने रस्त्यावरील बालकांसाठी फिरते पथक, कृत्रिम वाळू धोरण, ITI चं अद्ययावतीकरण, वेतनत्रुटी निवारण, स्मार्ट सिटीमधील घरांची दस्तऐवजीकरण सवलत, न्यायवैद्यकीय विद्यापीठासाठी जागा देणे असे सहा महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
दहावीत ३५% गुण मिळवूनही विशाल सलगर गावाचा हिरो ठरला आहे. शेतीकाम, गाईंची देखभाल आणि अभ्यास अशी तिहेरी जबाबदारी पेलत असतानाही त्याने दहावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. गावकऱ्यांनी त्याचा सत्कार केला आणि आता तो पुढील शिक्षणासाठी सज्ज झाला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा वैभव मोहोड लग्नाच्या आदल्या दिवशी बेपत्ता झाला आहे. त्याने ATM मधून ₹40,000 काढले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Maharashtra