MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Chhatrapati Sambhaji Maharaj कातडी सोलली, त्यावर मिठ चोळले, प्रचंड हाल केले, परंतु मृत्यूनंतर मराठेशाहीचे हे झाले

Chhatrapati Sambhaji Maharaj कातडी सोलली, त्यावर मिठ चोळले, प्रचंड हाल केले, परंतु मृत्यूनंतर मराठेशाहीचे हे झाले

छत्रपती संभाजी महाराज यांची आज १४ मे रोजी जयंती आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा शौर्यशील स्वभाव, निर्भय नेतृत्व आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान मराठा इतिहासात अजरामर आहे. 

3 Min read
Vijay Lad
Published : May 14 2025, 12:55 AM IST| Updated : May 14 2025, 08:43 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
112
Image Credit : Asianet News

संभाजी महाराजांच्या निधनानंतर, नेतृत्वाची जबाबदारी राजाराम महाराजांवर

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे भवितव्य अंधारात गेले. त्यांच्या धाकट्या भावाने, राजाराम महाराजांनी, मराठा स्वराज्याची धुरा हाती घेतली. परिस्थिती बिकट होती – औरंगजेब महाराष्ट्रात स्वतः युद्धभूमीवर उतरला होता आणि रायगड मुघलांच्या ताब्यात गेला होता.

212
Image Credit : Asianet News

राजाराम महाराजांनी स्वराज्याचा बचाव करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला, त्यांनी दक्षिणेकडील जिंजी (तमिळनाडू) या किल्ल्यावरून कारभार चालवण्यास सुरुवात केली. रामचंद्र पंत अमात्य, संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांसारख्या कर्तबगार सरदारांच्या मदतीने मराठा प्रतिकार चालूच राहिला.

Related Articles

Related image1
Chhatrapati Sambhaji Maharaj ४० दिवस क्रूर अत्याचार, जीभही छाटली, तरी बदलला नाही धर्म
Related image2
राजस्थानच्या राज्यपालांनी जयपूर येथील राजभवनात संभाजी महाराजांना वाहिली श्रद्धांजली
312
Image Credit : Asianet News

ताराराणी, एक बुद्धिमान आणि आक्रमक नेतृत्त्व

राजाराम महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी आपल्या अल्पवयीन पुत्र शिवाजी दुसरे यांच्यासाठी राज्यकारभार स्वीकारला. ताराराणी या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या आणि त्यांना राज्यकारभारात चांगला अनुभव होता. त्यांनी आपल्या शौर्य आणि कूटनीतीने मुघलांविरुद्धचा लढा सुरूच ठेवला.

ताराराणींच्या नेतृत्त्वात मराठा साम्राज्य पुन्हा सावरतं गेलं, परंतु पुढील मोठा टप्पा शाहू महाराजांच्या आगमनामुळे घडला.

412
Image Credit : Asianet News

शाहू महाराजांची सुटका आणि सत्तासंघर्ष

1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज मुघल कैदेतून मुक्त झाले. शाहू महाराजांनी गादीवर हक्क सांगितला. यातून ताराराणी आणि शाहू महाराज यांच्यात सत्तासंघर्ष सुरू झाला. अनेक सरदार शाहूंच्या बाजूने गेले. विशेषतः धनाजी जाधव शाहूंच्या गोटात गेल्यानंतर शाहूंचं पारडं अधिक जड झालं.

1708 मध्ये शाहू महाराजांनी साताऱ्यात सत्ता स्थापन केली आणि स्वराज्याच्या उत्तर भागात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.

512
Image Credit : Asianet News

दोन राजगादी, सातारा आणि कोल्हापूर

ताराराणींनी पन्हाळा, विशाळगड पुन्हा ताब्यात घेतले आणि 1710 मध्ये कोल्हापूर संस्थानाची स्थापना केली. यानुसार, मराठा साम्राज्य दोन भागांमध्ये विभागलं –

सातारा (शाहू महाराजांचे वंश)

कोल्हापूर (ताराराणींचे वंश)

612
Image Credit : Asianet News

ताराराणी आणि शिवाजी दुसरे यांनी कारभार चालवला, परंतु 1714 मध्ये राजसबाई आणि तिच्या मुलगा संभाजी दुसरे यांनी बंड करून ताराराणींना बाजूला सारले आणि शिवाजी दुसरे यांना नजरकैदेत ठेवले.

712
Image Credit : Asianet News

वारणेचा तह आणि पुढील सत्तासंस्था

1731 मध्ये वारणेचा तह झाला. त्यानुसार, वारणे नदीच्या उत्तरेस शाहूंचं सातारा संस्थान आणि दक्षिणेस संभाजी दुसऱ्यांचं कोल्हापूर संस्थान मान्य केलं गेलं. ताराराणी शाहूंना आपला नातू रामराजे हा शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचं सांगून गादीसाठी पाठिंबा मिळवण्यात यशस्वी ठरल्या. परंतु 1750 मध्ये त्यांनीच रामराजे हा खरा वारस नाही असं जाहीर करून त्यांना कैदेत टाकलं.

812
Image Credit : Asianet News

मराठा साम्राज्याचा शेवट आणि इंग्रजी हस्तक्षेप

1818 साली पेशवे बाजीराव दुसरे यांचा पराभव झाल्यानंतर मराठा साम्राज्याचा अंत झाला.

साताऱ्याचे प्रतापसिंह हे इंग्रजांच्या आश्रयाने गादीवर होते. त्यांना 1839 मध्ये पदच्युत करून राज्य खालसा करण्यात आलं.

1849 मध्ये सातारा संस्थान अखेर संपुष्टात आलं.

912
Image Credit : Asianet News

कोल्हापूर संस्थानाचा पुढील प्रवास

कोल्हापूरमध्ये शिवाजी दुसरे, शिवाजी तिसरे, राजाराम इत्यादींचा कारभार चालू राहिला.

19व्या शतकात राजर्षी शाहू महाराज (1874–1922) गादीवर आले. त्यांनी शिक्षण, जातीभेद निर्मूलन, आरोग्य, समाजसुधारणा यांसाठी अमूल्य कार्य केलं. त्यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर संस्थान एक आदर्श राज्य म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

1012
Image Credit : Asianet News

आधुनिक काळातील वारसा

राजर्षी शाहू महाराजांच्या निधनानंतर राजाराम, शिवाजी, शहाजी आणि पुढे शाहू महाराज दुसरे यांची गादीवर वर्णी लागली.

संभाजीराजे छत्रपती आणि मालोजीराजे छत्रपती हे आजच्या काळातील त्याच घराण्याचे वारसदार आहेत.

संभाजीराजे यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणूनही कार्य केलं आहे.

1112
Image Credit : Asianet News

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्यावर संकटांचं सावट पसरलं होतं. पण राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज, आणि पुढे राजर्षी शाहू महाराज यांच्या दूरदृष्टी, धैर्य, आणि नेतृत्वामुळे हे साम्राज्य नव्याने आकार घेऊ शकलं. सत्तासंघर्ष, दत्तक परंपरा, इंग्रजी हस्तक्षेप अशा अनेक उलथापालथींमध्येही मराठा परंपरेचा दिवा तेवत राहिला.

1212
Image Credit : Asianet News

आजही कोल्हापूर आणि साताऱ्याच्या भोसले घराण्यांमधून त्या परंपरेचा वारसा पुढे नेला जातो. हा इतिहास आपल्याला संघर्षातून सन्मान आणि न्याय मिळवण्याची प्रेरणा देतो.

About the Author

VL
Vijay Lad

Recommended Stories
Recommended image1
Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
Recommended image2
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!
Recommended image3
भाविकांसाठी बंपर गिफ्ट! शिर्डी आणि तिरुपतीला जाणाऱ्यांसाठी आता साप्ताहिक स्पेशल रेल्वे; लगेच पाहा संपूर्ण वेळापत्रक!
Recommended image4
Ration Card : दीड वर्षानंतर रेशनकार्ड धारकांना बंपर लॉटरी! 'या' वस्तूचा लाभ मिळणार, लगेच तपासा!
Recommended image5
आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी 4 मोठे मोर्चे, 4 आत्महत्यांचे गंभीर इशारे, 15 धरणे आंदोलन, 9 उपोषणे
Related Stories
Recommended image1
Chhatrapati Sambhaji Maharaj ४० दिवस क्रूर अत्याचार, जीभही छाटली, तरी बदलला नाही धर्म
Recommended image2
राजस्थानच्या राज्यपालांनी जयपूर येथील राजभवनात संभाजी महाराजांना वाहिली श्रद्धांजली
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved