पुण्यातील विमानतळावर झालेल्या मुसळधार पावसामुळे एक्झिट गेटजवळ पाणी साचले, ज्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. प्रशासनाने पाणी उपसण्यासाठी उपाययोजना केल्याचे सांगितले असून, भविष्यात अशा घटना टाळण्याचे आश्वासन दिले आहे.
Konkan Accident : रत्नागिरी येथे जगबुडी नदीपात्रात कार कोसळून अपघात झाल्याची दुर्घटना घडली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
महाराष्ट्रात पुढील दोन दिवस वादळी वारे, पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी हवामानाची शक्यता आहे. हवामान खात्याने 'ऑरेंज अलर्ट' जारी केला असून, शेतकरी, पर्यटक आणि शहरी भागांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Pune : येत्या 1 जूनपासून सिंहगडावर प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. यानुसार, गडावर प्लास्टिक बॉटल्स किंवा पिशव्या घेऊन जाणाऱ्यांना डिपॉझिट भरावे लागणार आहे.
मुळशीतील भुकूम येथे विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासे झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार सोहळ्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. गवई आंबेडकरी असल्यानेच त्यांचा अपमान झाल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधी हटवण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. ते म्हणाले की, वाघ्याचा छत्रपती शिवाजी महाराजांशी काहीही संबंध नाही आणि त्यांच्या समाधीशेजारी वाघ्याची समाधी असणे हे चुकीचे आहे.
CM देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्ज देताना CIBIL स्कोअरची मागणी करू नये असे बँकांना बजावले. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्यातील FPO, MSME क्षेत्राच्या विकासावरही त्यांनी भर दिला.
केईएम रुग्णालयात दोन रुग्णांच्या मृत्यूनंतर कोविडचा संशय आहे. सुरुवातीला रुग्णालयाने नकार दिला असला तरी, शिवसेना नेत्यांनी पुरावे सादर केल्यानंतर रुग्णालयाने कबुली दिली की दोघेही कोविड पॉझिटिव्ह होते.
पुणे काँग्रेसच्या महिला उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी पक्षातील ब्राह्मण असल्यामुळे भेदभाव आणि डावपेचांचे आरोप केले आहेत. त्यांनी पक्ष सोडण्याचा इशारा दिल्याने पुणे काँग्रेसमधील संघर्ष नव्या टप्प्यावर पोहोचला आहे.
Maharashtra