५६ व्या वर्षी, बरेच लोक त्यांच्या आयुष्यावर चिंतन करतात. भारतातील चेन्नई येथे राहणारे निवृत्त अभियंता श्रीराम राजगोपालन यांच्यासाठी, त्या चिंतनामुळे प्रार्थना ऐकली गेली... एमिरेट्स ड्रॉसह २३१ कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकला.
शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या मते शरद पवार लवकरच दुसऱ्या पक्षात प्रवेश करू शकतात आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होऊ शकतात. रोहित पवारांना शरद पवारांच्या वेगळ्या दिशेची जाणीव असल्याचेही त्यांनी म्हटले. शिरसाटांच्या मते मविआ फार काळ टिकणार नाही.
नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट भारतातील पहिले वॉटर टॅक्सी सेवा देणारे विमानतळ बनणार आहे. ८ वॉटर टॅक्सी मार्ग आणि १५ जेट्टीद्वारे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जोडले जातील, ज्यामुळे प्रवास जलद आणि सोपा होईल.
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी 600 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय घेतला आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपी कुटुंबातील दुसऱ्या सुनेवरही अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मयुरी जगताप हिच्यावर तिचा पती शशांक हगवणे आणि सासरच्यांकडून मारहाण आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोप आहे.
मुळशीतील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या सुनेच्या आत्महत्येनंतर तिच्या 9 महिन्यांच्या बाळाचे भविष्य अनिश्चित. कुटुंबीयांनी हुंड्याचा आरोप केला असून, बाळाची कस्टडी मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे.
राजेंद्र हगवणे यांच्या सुनेचा मृत्यू अपघात नसून हुंडाबळी असल्याचा आरोप वैष्णवीच्या मामांनी केला आहे. लग्नानंतर सहा महिन्यांतच वैष्णवीला मारहाण आणि मानसिक छळ सहन करावा लागला होता. वैष्णवीने आपल्या मामांना आपली व्यथा सांगितली होती.
मुळशीतील राष्ट्रवादी नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तिच्या जाऊने सासरच्या भीषण छळाचे धक्कादायक खुलासे केले आहेत. वैष्णवीला साडी नेसण्यापासून ते गाडीच्या मागणीपर्यंत अनेक गोष्टींवरून छळ केला जात होता.
लग्नाच्या एकाच मंचावर दोन पद्धतीने विवाहसोहळा पार पडल्याची चर्चा सध्या रंगली आहे. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया…
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपांखाली अटकेत असलेली युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्याविरोधात रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत.
Maharashtra