यंदा पावसाळा एक आठवडा आधी केरळमध्ये दाखल झाला असून, दोन दिवसांत महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. हे लवकर आगमन कृषी आणि ऊर्जा क्षेत्रासाठी संधी आणि आव्हान दोन्ही बनले आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी छगन भुजबळ यांचे नाव पुढे केल्याने राज्याच्या सत्तासमीकरणात खळबळ उडाली आहे. फडणवीस यांच्या निर्णयावर हे अवलंबून असल्याचे महाजन म्हणाले.
डेक्कन जिमखाना परिसरातील 'गारव्या वडापाव' आपल्या खमंग वडा, क्रिस्पी बाह्यभाग आणि खास लसूण चटणीसाठी प्रसिद्ध आहे. संध्याकाळी गर्दी असलेल्या या ठिकाणी विद्यार्थी, ऑफिस कर्मचारी, पर्यटक आणि सेलिब्रिटीही वडापावचा आस्वाद घेण्यासाठी येतात.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासरच्या पाच सदस्यांसह पतीला अटक झाली असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोपांसह मोठा गौप्यस्फोट करण्याचा दावा केला आहे.
परभणी जिल्ह्यातील झरी गावात साक्षी चंद्रप्रकाश लाटे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. पती, सासू-सासरे आणि दीर-जाऊ यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप आहे. भरोसा सेलकडे मदत मागूनही न्याय मिळाला नाही.
कोंडिवडे गावात पतीने चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा दगडाने ठेचून खून केला. मृत महिलेचे नाव सोनाबाई वाघमारे असून आरोपी पती अशोक वाघमारे याला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर परिसरात हादरवून गेला आहे.
नाशिकमधील गंगापूर परिसरात भक्ती गुजराथी या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. नातेवाईकांनी सासू-सासरे, पती आणि नणंद यांच्यावर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपद मिळालेल्या छगन भुजबळांनी मुंडेंना क्लीनचिट मिळाल्यास राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्रिपदाची ऑफर असतानाही शरद पवारांसोबत राहिल्याचा खुलासाही त्यांनी केला.
धुळे विश्रामगृहात सापडलेल्या १.८४ कोटीच्या रोकड प्रकरणी माजी आमदार अनिल गोटे यांनी गृह खात्यावर गंभीर आरोप केले. तपासाला दबावाखाली दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत त्यांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवण्याचे षड्यंत्र रचल्याचा आरोप केला.
करुणा शर्मा यांनी रुपाली चाकणकर यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवडीवरून सौंदर्याचा मुद्दा उपस्थित करत टीका केली आहे. या टीकेमुळे राजकारणात महिलांच्या कामगिरीऐवजी त्यांच्या सौंदर्यावर चर्चा होण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Maharashtra