महाविकास आघाडीमध्ये असलेल्या पक्षांमध्ये कायम असलेल्या गटबाजी आणि अंतर्गत संघर्षांमुळे एकात्मता साधता आलेली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रियतेत घट झाली. आदी कारणांमुळे महाविकास आघाडीला निवडणुकीत मोठा फटका बसला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये महायुतीच्या विजयाची प्रमुख कारणे विकासात्मक कार्ये, भाजपाची मजबूत स्थिती, शिवसेना गटाची एकजूट, केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ, विरोधी पक्षांचा विखुरलेला स्वरूप, मतदारांचा विश्वास, आदींचा समावेश आहे.
Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 च्या जागांवरील निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच राज्यातील राजकीय पक्षांतील नेत्यांनी निकालाबद्दल काय मत व्यक्त केलेय हे जाणून घेऊया…
आज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होणार असून सरकार कोणाचे येणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडी की महायुती कोण सरकार स्थापन करणार याकडे लक्ष लागलय.