- Home
- Maharashtra
- Ladki Bahin Yojana: मोठी घोषणा! 'लाडक्या बहिणींच्या' खात्यात खटाखट ₹१५०० जमा होणार; सरकारने चिंता मिटवली!
Ladki Bahin Yojana: मोठी घोषणा! 'लाडक्या बहिणींच्या' खात्यात खटाखट ₹१५०० जमा होणार; सरकारने चिंता मिटवली!
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील KYC प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारने वेबसाईटमध्ये मोठे बदल सुरू केले आहेत. या बदलांमुळे पती किंवा वडिलांचे नाव नसलेल्या महिलांसह सर्व लाभार्थींना सहजपणे KYC पूर्ण करता येणार आहे.

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर!
Ladki Bahin Yojana KYC Update: राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाखो महिलांच्या खात्यात दरमहा ₹1500 ची आर्थिक मदत जमा केली जाते. या मदतीमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळाले असले तरी, अलीकडे KYC प्रक्रियेतील अडचणींमुळे अनेकजणी चिंतेत होत्या. मात्र, आता राज्य सरकारने महिलांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर आवश्यक तांत्रिक बदल सुरू आहेत, ज्यामुळे पुढील काही दिवसांत सर्व लाभार्थींना सहजपणे KYC पूर्ण करता येणार आहे.
काय बदल होणार वेबसाईटमध्ये?
तटकरे म्हणाल्या की, “ज्या महिलांच्या नावावर पती किंवा वडील नाहीत, अशांना आतापर्यंत KYC पूर्ण करता येत नव्हते. या तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी संकेतस्थळावर मोठे अपडेट केले जात आहेत. या सुधारणा पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक लाभार्थी महिला KYC करू शकेल.”
तांत्रिक अडचणींवर सरकारचा तोडगा
KYC करताना अनेक महिलांना वेबसाईटवर लॉगिन, दस्तऐवज अपलोड आणि प्रमाणीकरण यामध्ये अडचणी येत होत्या. यावर तोडगा म्हणून IT विभागाने नवीन फीचर्स जोडण्याचे काम सुरू केले आहे. बदल पूर्ण झाल्यानंतर ही प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे, अशी खात्री मंत्र्यांनी दिली.
KYC साठीची अंतिम तारीख आणि पुढचं काय?
सध्या KYC करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2025 अशी आहे. अनेक महिलांनी सरकारला ही मुदत वाढवण्याची मागणी केली आहे. तटकरे यांनी सांगितले की, “प्रशासन महिलांच्या अडचणींवर लक्ष ठेवून आहे; गरज भासल्यास मुदतवाढही विचारात घेतली जाईल.”
सरकारच्या या निर्णयामुळे आता लाडक्या बहिणींना KYC संदर्भातील तांत्रिक अडचणींमुळे होणारी चिंता संपणार आहे. यामुळे महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ अखंडपणे मिळत राहणार आहे.

