- Home
- Maharashtra
- कोकण रेल्वे प्रवाशांनी लक्ष द्या! वेळापत्रकात मोठे बदल, काही गाड्या उशिरा तर काही रद्दही
कोकण रेल्वे प्रवाशांनी लक्ष द्या! वेळापत्रकात मोठे बदल, काही गाड्या उशिरा तर काही रद्दही
Konkan Railway Train Schedule Changes: कोकण रेल्वे मार्गावर १२ ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत थोकूर ते जोकाटे दरम्यान रेल्वे दुहेरीकरणाच्या कामामुळे मोठा बदल होणारय. या प्री-एनआय ब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द, उशिरा, अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.

कोकण रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या!
मुंबई: कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीत थोकूर ते जोकाटे दरम्यान रेल्वे दुहेरीकरणाचं महत्त्वाचं काम हाती घेतलं जाणार आहे. या कालावधीत काही गाड्या उशिराने धावतील, काहींच्या वेळेत बदल करण्यात आला आहे, तर काही गाड्या आंशिक किंवा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.
‘प्री-एनआय ब्लॉक’मुळे वेळापत्रकात फेरबदल
दक्षिण रेल्वेकडून या कामासाठी ‘प्री-एनआय ब्लॉक’ घेतला जाणार आहे. या दरम्यान थोकूर आणि जोकाटे यार्ड परिसरात नवीन रुळ जोडणे आणि पॉइंट्स बसविण्याचे महत्त्वाचे काम होणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या हालचालीवर परिणाम होणार आहे.
बदललेले वेळापत्रक (मुख्य गाड्या)
14 नोव्हेंबर: बंगळुरू–कारवार (16595) गाडी 80 मिनिटे, त्रिवेंद्रम उत्तर–भावनगर (19259) 15 मिनिटे, आणि लोकमान्य टिळक–त्रिवेंद्रम (16345) 20 मिनिटे उशिरा धावतील.
15 नोव्हेंबर: पोरबंदर–त्रिवेंद्रम उत्तर (20910) 20 मिनिटे नियंत्रित राहील.
16 नोव्हेंबर: जामनगर–तिरुनेलवेली (19578) 30 मिनिटांनी उशिरा; 17 नोव्हेंबरला हीच गाडी 100 मिनिटे उशिरा धावेल. त्याच दिवशी बंगळुरू–कारवार गाडी 20 मिनिटे उशिरा सुटेल.
बदललेले वेळापत्रक (मुख्य गाड्या)
18 नोव्हेंबर: कोयंबतूर–जबलपूर (02197) आणि एर्नाकुलम–पुणे (11098) या गाड्या अनुक्रमे रात्री 8:05 व 9:50 वाजता सुटतील. इतर काही गाड्यांनाही 15 ते 150 मिनिटांचा उशीर होणार आहे.
23 नोव्हेंबर: मुंबई सीएसएमटी–मंगळूर (12133) गाडी सुरतकल येथेच थांबवून पुढे रद्द केली जाईल. उलट दिशेची 12134 मंगळूर–मुंबई गाडी सुरतकलहूनच सुटेल.
याशिवाय मुरुडेश्वर–बंगळुरू (16583) आणि पुणे–एर्नाकुलम (11097) या गाड्यांनाही अनुक्रमे 120 आणि 50 मिनिटांचा उशीर होईल.
प्रवाशांनी काय करावे?
कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासापूर्वी आपले ट्रेनचे वेळापत्रक तपासूनच स्टेशनवर पोहोचावे. या कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली आहे.
दुहेरीकरणामुळे काय फायदा होणार?
या दुहेरीकरणामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक वेगवान आणि वक्तशीर होणार असून, भविष्यात प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळेल, असा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

