नागपुरात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी रणनीती, कार्यपद्धती आणि प्रचारयंत्रणेवर चर्चा केली.
पुण्याजवळील कुंडमळा येथे रविवारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून भीषण दुर्घटना घडली. अनेक पर्यटक वाहून गेले, तर काहींचे प्राण गेले. एनडीआरएफच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर अनेकांना वाचवले.
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ पर्यटक वाहून गेल्याची भीती आहे.
मनालीत झिपलाइन साहसांदरम्यान केबल तुटल्याने एक तरुणी ३० फूट उंचीवरून खाली पडली. या घटनेचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून, सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राज्यातील विद्यार्थ्यांना लवकरच शाळांमधूनच एस.टी. बस पास मिळणार आहेत. १६ जूनपासून ही सुविधा सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना वेगळे कार्यालय गाठण्याची गरज नाही. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेष फायदा होणार आहे.
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने १५ ते १८ जून दरम्यान रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केले असून, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
पुण्यात सततच्या पावसामुळे आणि मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांवरील मलब्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी मेट्रो अधिकाऱ्यांना दोन दिवसांची मुदत दिली असून, मलबा न हटवल्यास PMRDA वर ₹10 कोटींचा दंड ठोठावण्याचा इशारा दिला आहे.
शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांग मानधनवाढीसाठी बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सातव्या दिवशी स्थगित. सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित, मात्र 2 ऑक्टोबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा.
गोवंडीतील शिवाजीनगर भागात भरधाव डंपरने तिघांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले आणि वाहतूक ठप्प झाली.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून शेतकरी कर्जमाफीबाबत एक मोठा गौप्यस्फोट समोर आला आहे. मंत्री प्रकाश आबिटकर यांनी 'लाडकी बहीण' योजनेमुळे कर्जमाफीच्या निर्णयाला विलंब होत असल्याचा दावा केला आहे.
Maharashtra