कोल्हापूरात दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. एक म्हणजे महिन्याभरापूर्वी झालेल्या नवदांपत्याचा गॅस गिझर गळतीमुळे मृत्यू तर दुसऱ्या घटनेत इंद्रायणी पूल कोसळल्याने त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेलगाव देशमुख गावात नागरिकांच्या हातांना खोल भेगा पडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आरोग्य विभागाच्या तपासणीत 'इसबगोल' या ऑटोइम्यून त्वचाविकाराची लक्षणे आढळून आली असून, हा आजार संसर्गजन्य नाहीये, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेत चार जणांचा मृत्यू, तर १८ जण गंभीर जखमी झाले. घटनास्थळी शोध व बचावकार्य अखेर सोमवारी (१६ जून) संपवण्यात आले असून, सर्व बेपत्ता व्यक्ती सापडल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (NDRF) दिली आहे.
MHT CET 2025 PCM गटाचा निकाल जाहीर झाला आहे. PCB गटाचा निकाल १७ जून रोजी येईल. लवकरच समुपदेशन वेळापत्रकही जाहीर होईल. निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी थेट दुवा उपलब्ध आहे.
नवी मुंबईत एका पाकिस्तानी पुरुषाने आपल्या पत्नीचा खून करून आत्महत्या केली. दीर्घकालीन व्हिसावर भारतात राहणारे हे जोडपे दोन मुलांसह होते आणि त्यांच्यात घरगुती वाद सुरू होता, असे पोलिसांनी सांगितले.
मुंबईच्या आसपास निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाणांचा खजिना आहे. हिरव्यागार टेकड्या, धबधबे आणि किल्ले यांचा समावेश असलेली ही ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात. निसर्गाच्या सान्निध्यात सुट्टी घालवण्यासाठी मुंबईजवळ अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
Monsoon Update : राज्यासाठी पुढील 48 तास धोक्याचे असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यावेळी राज्यात तीव्र पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.
माथेरान येथे फिरण्यासाठी नवी मुंबईतून काही विद्यार्थी आले होते. यावेळी शार्लोट लेक तलावात तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.
कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. अनेक पर्यटक वाहून गेले असून, बचावकार्य सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी हृदयद्रावक आहेत.
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून भीषण दुर्घटना घडली. खासदार सुप्रिया सुळे घटनास्थळी दाखल होत मदतकार्यात पुढाकार घेतला आणि जखमींना आधार दिला. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.
Maharashtra