नागपुर ते मडगाव ट्रेन येत्या 8 जूनपर्यंत चालवली जाणार आहे. याशिवाय मडगाव ते नागपुर दरम्यान स्पेशल ट्रेन 9 जूनपर्यंत धावणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आणखी दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाने अपक्ष खासदार नवनीत राणा यांना अमरातवती येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत उमेदवारांची यादी जारी केलीय.
पुण्यातील मावळ येथे एका सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंडिया आघाडीवर टीका केली आहे. याशिवाय महाराष्ट्रात भाजपला 41 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल असा दावा देखील अमित शाह यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्यात. यंदा राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. अशातच महाविकास आघाडीमधील सीट शेअरिंगचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही.
गुरुवारी सकाळी हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे. जिल्ह्यात 4.5 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशातच बारामतीच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांनी पुणे लोकलने प्रवास केला.
गडचिरोली येथे पोलीस आणि C-60 कमांडोंनी संयुक्त कार्यवाही करत चार नक्षलवाद्यांना ठार केले आहे. नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्रास्रे जप्त करण्यात आली आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीमधील जागा वाटपाबद्दल एक मोठे विधान केले आहे. नाना पटोले यांनी म्हटले की, येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये उमेदवारांची यादी जारी केली जाईल.