पुणे येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणात कोणती गाडी वापरली होती आणि तिचे कोणते स्पेसिफिकेशन आहेत ते आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. चला तर मग, घेऊया जाणून
सोमवारी संध्याकाळी विमानाला धडक दिल्यामुळे फ्लेमिंगो पक्षी ठार झाले आहेत. एमिरेट्स कंपनीचे विमानतळावर उतरत असताना हा अपघात झाला असून त्या पक्षांचे पोस्टमार्टम करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
पुणे येथील कल्याणीनगर परिसरात शनिवारी रात्री झालेल्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवालला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आज न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.
Maharashtra HSC Board Results 2024 : महाराष्ट्र बोर्ड परीक्षेचा निकाल 21 मे ला अखेर जाहीर केला जाणार आहे. दुपारी 1 वाजता निकाल लागणार आहे. अशातच आर्ट्सचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर टॉप-10 करियर ऑप्शन कोणते याबद्दल जाणून घेऊया.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड शहरातील नगरपंचायत समोरील रोडवर दोन पादचारी तरुणांना कारने उडवलय.
लाखो प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या निष्ठेसमोर नतमस्तक, असल्याचं त्यांनी पत्राच्या माध्यमातून सांगितलेय. त्याशिवाय चार जून रोजी आपण सर्वजण जल्लोष करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
जळगावात सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्सवर दरोडा घातल्याचा प्रकार घडला आहे. दरोडेखोरांनी लाखो रुपयांचे सोने लुटून नेले असून यामुळे जळगावमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
पुण्यात शनिवारी भरधाव गाडीत जाणाऱ्या मुलाने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या आरोपीला अपघात झाल्यानंतर दहा तासानंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या घटनेमुळे पुण्यातून संताप व्यक्त केला जात आहे.
नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी मतदान केल्यानंतर आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला घातला. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने बारावीच्या निकाल पाहता येईल. त्यानंतर महाविद्यालयांमध्ये त्यांना गुणपत्रिका वितरीत केल्या जातील.