खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. विकासाच्या दृष्टीने आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले असून, या 'ऑपरेशन टायगर'साठी तानाजी सावंत यांनी त्यांची भेट घेतली आहे.

ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलून हा निर्णय जाहीर केला आहे. आता तानाजी सावंत हे गोवर्धनवाडी (धाराशिव) येथे पोहचले आहेत. ओमराजे हे शिवसेनेत जाणार असून विकासाच्या दृष्टीने मी हा निर्णय घेतला असल्याचं ओमराजे यांनी हा निर्णय घेतला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

शिवसेना प्रवेशाची घोषणा 

बाकी शिवसेना प्रवेशाची फक्त आता घोषणा पत्रकारपरिषदेत ओमराजे निंबाळकर यांनी हा निर्णय घेतला आहे. ओमराजे यांनी सत्तेत जाण्याचा अखेर ठरलं आहे. सत्तेत गेल्याशिवाय लोकांची काम होणार नाही. गोवर्धनवाडी येथे कार्यकर्त्यांसोबत बोलल्यानंतर हे ठरलं. तानाजी सावंत यांच्यावर या ऑपरेशन टायगरची जबाबदारी असल्याचं सांगितलं आहे.

ओमराजे यांचं ठरलं 

ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी कोर्टाचा निर्णय झाला आहे. माझे ओमराजे यांच्यासोबत कौटुंबिक संबंध असल्याने आपण त्यांची भेट घेण्यासाठी आल्याचं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. आता बाकी खासदार काय निर्णय घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील आहे. ओमराजेंपाठोपाठ बाकी खासदार काय निर्णय घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील आहे.