Fire Department Vacancy : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिक महानगरपालिकेने अग्निशमन विभागात 186 पदांची भरती जाहीर केली आहे. यामध्ये चालक-यंत्र चालक आणि फायरमन या पदांचा समावेश असून, पुरुष व महिला उमेदवार अर्ज करू शकतात.
नाशिक : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पार पडणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असून, या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती करत आहे. काही दिवसांपूर्वी तांत्रिक पदांसाठी नोकरभरती जाहीर झाल्यानंतर आता अग्निशमन विभागात तब्बल 186 पदांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती ऑक्टोबर 2025 मध्ये जाहीर झाली होती, मात्र उमेदवारांना संधी देण्यासाठी अर्जाची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे.
NMC Fire Department – 186 पदांसाठी मोठी भरती
अग्निशमन दलात खालील दोन प्रमुख पदांसाठी भरती केली जात आहे.
चालक-यंत्र चालक / वाहन चालक (अग्निशमन)
फायरमन (अग्निशामक)
ही भरती गट-क आणि गट-ड मधील पदांवर होत आहे.
एकूण जागा – 186, त्यापैकी:
36 जागा: चालक-यंत्र चालक / वाहन चालक
150 जागा: फायरमन (अग्निशामक)
ही भरती पुरुष आणि महिला दोघांसाठी आहे. नाशिक महापालिकेने निर्धारित शारीरिक पात्रता निकष स्पष्ट केले आहेत.
शारीरिक पात्रता (Physical Standards)
पुरुषांसाठी:
उंची: 165 सेमी
छाती: 81 सेमी (फुगवून 5 सेमी वाढ आवश्यक)
वजन: किमान 50 किलो
महिलांसाठी:
उंची: 157 सेमी
छाती: निकष नाही
वजन: किमान 46 किलो
शैक्षणिक पात्रता
1) चालक-यंत्र चालक / वाहन चालक (अग्निशमन)
10वी उत्तीर्ण
राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 6 महिन्यांचा अग्निशामक कोर्स
किंवा
वाहनचालक म्हणून किमान 3 वर्षांचा अनुभव
2) फायरमन (अग्निशामक)
10वी उत्तीर्ण
राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 6 महिन्यांचा अग्निशामक कोर्स
वयोमर्यादा
1 डिसेंबर 2025 रोजी: 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय / अनाथ / EWS: 5 वर्षांची सूट
अर्ज शुल्क
खुला प्रवर्ग: ₹1000
राखीव / अनाथ उमेदवार: ₹900
अपंग उमेदवारांना शुल्कातून पूर्ण सूट.
पगार श्रेणी
दोन्ही पदांसाठी पगार समान:
₹19,900 – ₹63,200
महत्वाच्या लिंक
ऑनलाइन अर्ज लिंक - https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32773/93396/Index.html
नाशिक महानगरपालिका अधिकृत वेबसाइट - https://nmc.gov.in/
कुंभमेळा तयारीसाठी मोठी संधी, इच्छुक उमेदवारांनी तात्काळ अर्ज करा
सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान सुरक्षेची जबाबदारी लक्षात घेता अग्निशमन विभागातील ही भरती अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारी नोकरीची संधी, चांगला पगार आणि कायमस्वरूपी रोजगार शोधणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे.


