MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Holi Special Trains: होळीसाठी रेल्वेची 'स्पेशल' भेट! मुंबई आणि पुण्यातून सुटणार विशेष गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Holi Special Trains: होळीसाठी रेल्वेची 'स्पेशल' भेट! मुंबई आणि पुण्यातून सुटणार विशेष गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक

होळीच्या सणासाठी प्रवाशांची गर्दी कमी करण्याकरिता मध्य रेल्वेने एक विशेष भेट दिली. मुंबई (LTT) ते हटिया, पुणे ते दानापूर दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या मार्च महिन्यात धावतील, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 01 2026, 04:15 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
होळीसाठी रेल्वेची 'स्पेशल' भेट! मुंबई आणि पुण्यातून सुटणार विशेष गाड्या
Image Credit : social media

होळीसाठी रेल्वेची 'स्पेशल' भेट! मुंबई आणि पुण्यातून सुटणार विशेष गाड्या

मुंबई: होळीच्या सुट्टीत गावी जाण्याचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे स्थानकांवरील गर्दी टाळण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास विनासायास व्हावा यासाठी मध्य रेल्वेने मुंबई (LTT) ते हटिया आणि पुणे ते दानापूर दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या फेऱ्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या विशेष गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
१. लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते हटिया विशेष रेल्वे
Image Credit : South Western Railways - SWR

१. लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते हटिया विशेष रेल्वे

गाडी क्रमांक ०८६१०: ही गाडी ०४ मार्च आणि ११ मार्च रोजी मुंबईतून (LTT) पहाटे ०५.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.०० वाजता हटियाला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०८६०९ (परतीचा प्रवास): ही गाडी ०२ मार्च आणि ०९ मार्च रोजी हटिया येथून पहाटे ०४.२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी १२.४० वाजता मुंबईला पोहोचेल.

प्रमुख थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, नागपूर, गोंदिया, रायपूर आणि बिलासपूर. 

Related Articles

Related image1
Pune Traffic Alert: पुणेकरांनो लक्ष द्या! विद्यापीठ रस्ता 'या' वेळेत महिनाभर असणार बंद; प्रवासापूर्वी हे वाचाच!
Related image2
मुंबई-गोवा रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! भर उन्हाळ्यात 'या' ८ एक्स्प्रेस गाड्या रद्द; पर्यटनाचा प्लॅन करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा
34
२. पुणे ते दानापूर विशेष रेल्वे (एकूण ६ फेऱ्या)
Image Credit : South Western Railways - SWR

२. पुणे ते दानापूर विशेष रेल्वे (एकूण ६ फेऱ्या)

गाडी क्रमांक ०१४७९: ही गाडी ०१ मार्च, ०५ मार्च आणि ०९ मार्च रोजी पुण्याहून रात्री ०८.५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ०८.०० वाजता दानापूरला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१४८० (परतीचा प्रवास): ही गाडी ०३ मार्च, ०७ मार्च आणि ११ मार्च रोजी दानापूर येथून सकाळी १०.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ०९.१५ वाजता पुण्यात येईल.

प्रमुख थांबे: अहिल्यानगर (अहमदनगर), कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर (मदन महल), प्रयागराज छिवकी आणि बक्सर. 

44
महत्त्वाची टीप, आरक्षणाबाबत अपडेट
Image Credit : South Western Railways - SWR

महत्त्वाची टीप, आरक्षणाबाबत अपडेट

गाडी क्रमांक ०८६१० साठीचे बुकिंग ०२ मार्चपासून सर्व अधिकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या संकेतस्थळावर (IRCTC) सुरू होईल. प्रवाशांनी लवकरात लवकर आपले तिकीट आरक्षित करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
CNG Price in Maharashtra : सीएनजी दरवाढीचा आणखी एक झटका! पुण्यात गॅस महागला, पेट्रोल-डिझेल पाठोपाठ वाहनचालकांची चिंता वाढली
Recommended image2
'राजा शिवाजी'साठी मुख्यमंत्र्यांचा फोन; रितेश देशमुख झाला भावूक
Recommended image3
जळगाव सराफा बाजारात मोठी घसरण, सोने खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी
Recommended image4
राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘वादळ’; तटकरे नाराज, प्रफुल पटेल गैरहजर, पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत
Recommended image5
दिल्लीत आज महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘मेगा बैठक’; कांदा, पाणी आणि एसटीच्या प्रश्नांवर होणार निर्णायक चर्चा
Related Stories
Recommended image1
Pune Traffic Alert: पुणेकरांनो लक्ष द्या! विद्यापीठ रस्ता 'या' वेळेत महिनाभर असणार बंद; प्रवासापूर्वी हे वाचाच!
Recommended image2
मुंबई-गोवा रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! भर उन्हाळ्यात 'या' ८ एक्स्प्रेस गाड्या रद्द; पर्यटनाचा प्लॅन करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved