MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • शेतकऱ्यांचे नशीब फळफळणार! पशुपालन व्यवसायासाठी सरकार देतंय ३० लाखांपर्यंत मदत; 'असा' घ्या या योजनेचा लाभ

शेतकऱ्यांचे नशीब फळफळणार! पशुपालन व्यवसायासाठी सरकार देतंय ३० लाखांपर्यंत मदत; 'असा' घ्या या योजनेचा लाभ

Maharashtra Animal Husbandry Scheme: महाराष्ट्र शासनाने 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना' सुरू केली आहे, ज्याद्वारे दुग्ध व्यवसाय, शेळीपालन आणि कुक्कुटपालनासाठी ३० लाखांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 31 2026, 03:36 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
पशुपालन व्यवसायासाठी सरकार देतंय ३० लाखांपर्यंत मदत
Image Credit : iSTOCK

पशुपालन व्यवसायासाठी सरकार देतंय ३० लाखांपर्यंत मदत

मुंबई: केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी पूरक व्यवसायातून आर्थिक प्रगती करावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना' सुरू केली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत करणाऱ्या या योजनेद्वारे दुग्ध व्यवसाय, शेळीपालन आणि कुक्कुटपालनासाठी आता लाखोंचे अनुदान मिळणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
काय आहे ही योजना?
Image Credit : iSTOCK

काय आहे ही योजना?

ही योजना केवळ जनावरे खरेदीपुरती मर्यादित नसून, एक संपूर्ण 'बिझनेस मॉडेल' म्हणून विकसित करण्यात आली आहे. यामध्ये पशुधनासोबतच व्यवसायासाठी लागणाऱ्या आधुनिक पायाभूत सुविधांवर शासनाचा विशेष भर आहे. 

Related Articles

Related image1
Ration Card: रेशन कार्ड बंद पडलंय? टेन्शन सोडा! आता घरबसल्या मोबाईलवर करा 'चुटकीसरशी' सुरू; जाणून घ्या सोपी प्रोसेस
Related image2
शेतकऱ्यांची दिवाळी! २ लाखांच्या कर्जमाफीत आता 'या' मोठ्या कर्जांचाही समावेश; २४ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा!
36
योजनेतील मुख्य आकर्षणे
Image Credit : iSTOCK

योजनेतील मुख्य आकर्षणे

कुक्कुटपालन (Poultry): मोठ्या प्रमाणावरील कुक्कुटपालनासाठी (५००० पक्षी) तब्बल ३० लाख रुपयांचा प्रकल्प उपलब्ध आहे. यात अत्याधुनिक शेड आणि ऑटोमेशन सिस्टिमचा समावेश असेल.

दुग्ध व्यवसाय: दुधाळ गाई किंवा म्हशींच्या खरेदीसाठी आणि त्यांच्या ३ वर्षांच्या विम्यासाठी विशेष आर्थिक तरतूद.

शेळी-मेंढी पालन: '५+१' किंवा '१०+१' अशा गटात वाटप. मोठ्या प्रकल्पांसाठी (५० माद्या + ५ नर) सुमारे ११.३८ लाख रुपयांपर्यंतची मदत.

पायाभूत सुविधा: शेड उभारणी, आधुनिक यंत्रसामग्री आणि विमा संरक्षणासाठी भरघोस अनुदान. 

46
पात्रता आणि आरक्षण, कोणाला मिळणार लाभ?
Image Credit : iSTOCK

पात्रता आणि आरक्षण, कोणाला मिळणार लाभ?

या योजनेत पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता राखण्यासाठी सरकारने काही निकष ठरवले आहेत.

लाभार्थी: अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक शेतकरी आणि वनहक्क धारक.

महिलांना प्राधान्य: महिला बचत गट आणि वैयक्तिक महिला लाभार्थ्यांसाठी ३० ते ५० टक्के आरक्षण.

दिव्यांग बांधव: दिव्यांगांसाठी ५ टक्के कोटा राखीव.

जागेची अट: स्वतःची मालकीची जमीन असावी किंवा किमान ५ वर्षांचा भाडेपट्टा (Lease Agreement) असणे अनिवार्य. 

56
राज्यस्तरीय मोठे प्रकल्प
Image Credit : iSTOCK

राज्यस्तरीय मोठे प्रकल्प

जिल्हास्तरासोबतच राज्यस्तरावरही मोठे व्यावसायिक प्रकल्प राबवले जात आहेत. ५ दुधाळ जनावरांच्या गटासाठी सुमारे ११.३५ लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला असून, यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे. 

66
अर्ज कोठे आणि कसा करावा?
Image Credit : Asianet News

अर्ज कोठे आणि कसा करावा?

या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे पावले उचलावीत.

आपल्या जवळच्या पशुधन विकास अधिकाऱ्याशी (LDO) संपर्क साधावा.

तालुका किंवा जिल्हा स्तरावरील सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट देऊन अर्जाचा नमुना आणि कागदपत्रांची माहिती घ्यावी.

पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत पोर्टलवर लक्ष ठेवावे. 

जर तुमची स्वतःची जमीन असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर राज्य सरकार तुम्हाला ३० लाखांपर्यंतचे भांडवल देऊन स्वतःचा उद्योग उभा करण्यास मदत करत आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत का नाही, पत्रकार परिषदेत काय केला खुलासा?
Recommended image2
Maratha Reservation Agitation : ‘सरकारकडून वारंवार विश्वासघात’; मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल, नव्या आंदोलनाचे संकेत
Recommended image3
Missing Link Accident : मिसिंग लिंक पुन्हा चर्चेत; बसची तीन वाहनांना जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
Recommended image4
लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले पैसे, एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा
Recommended image5
तटकरे आणि पटेल यांना कार्यकारणीतून वगळले, सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाने बसला सर्वांना धक्का
Related Stories
Recommended image1
Ration Card: रेशन कार्ड बंद पडलंय? टेन्शन सोडा! आता घरबसल्या मोबाईलवर करा 'चुटकीसरशी' सुरू; जाणून घ्या सोपी प्रोसेस
Recommended image2
शेतकऱ्यांची दिवाळी! २ लाखांच्या कर्जमाफीत आता 'या' मोठ्या कर्जांचाही समावेश; २४ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved