- Home
- Maharashtra
- Monkey Pox: मंकी पॉक्सचा धुळ्यात शिरकाव; महाराष्ट्रात पहिल्या रुग्णाची पुष्टी, प्रशासन अलर्ट मोडवर
Monkey Pox: मंकी पॉक्सचा धुळ्यात शिरकाव; महाराष्ट्रात पहिल्या रुग्णाची पुष्टी, प्रशासन अलर्ट मोडवर
Monkey Pox: धुळ्यात सौदी अरेबियातून आलेल्या एका व्यक्तीला मंकी पॉक्सची लागण झाल्याचे निदान झाले, हा महाराष्ट्रातील पहिलाच रुग्ण आहे. या रुग्णाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला आहे.

स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क
धुळे: धुळ्यात मंकी पॉक्सचा (Monkeypox) पहिला रुग्ण सापडल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या या संसर्गजन्य आजाराचा प्रदेशात प्रवेश झाल्याने स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहेत.
पहिला रुग्ण धुळ्यात
2 ऑक्टोबर 2025 रोजी, दीर्घकाळ सौदी अरेबियात राहणाऱ्या एका व्यक्तीने धुळ्यातील गरीब नवाज नगर येथे आगमन केले. मुलीच्या लग्नासाठी आलेल्या या व्यक्तीला त्वचेवर अस्वस्थता जाणवू लागल्यावर, 3 ऑक्टोबर रोजी त्याने हिरे रुग्णालयात तपासणीसाठी भेट दिली. तपासणीतून त्याचे मंकी पॉक्स पॉझिटिव्ह आढळले, ज्यामुळे तातडीने त्याला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.
पॉझिटिव्ह रिपोर्ट आणि संपर्क व्यक्तींचा शोध
डॉक्टरांनी रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय व्हायरोलॉजी संस्था (NIV) कडे तपासणीसाठी पाठवले. दोन्ही तपासण्यांमध्ये मंकी पॉक्सची पुष्टी झाली आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना देखील याबाबत सूचित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील पहिली केस
पुण्यातील NIV ने स्पष्ट केले आहे की धुळ्यातील हा रुग्ण महाराष्ट्रातील मंकी पॉक्सचा पहिला आढळलेला प्रकरण आहे. मंकी पॉक्सचे दोन व्हेरियंट आहेत, त्यापैकी ‘क्लायड-1’ हा अधिक संसर्गजन्य आणि दुर्मिळ मानला जातो. भारतात आतापर्यंत 35 रुग्ण आढळले असून, महाराष्ट्रात ही पहिलीच पुष्टी झाली आहे.
प्रशासनाकडून खबरदारी
रुग्णाला डायबेटीजसारखा आजार असल्यामुळे बरे होण्यास काही काळ लागू शकतो. प्रशासनाने संसर्ग टाळण्यासाठी महापालिका आणि जिल्हाधिकारी यांना सूचित केले असून, आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.

