पुन्हा खेला होबे! लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार, भाजपा नेत्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा गटाबद्दल केले 'हे' मोठे विधान

| Published : May 16 2024, 11:11 AM IST / Updated: May 16 2024, 11:13 AM IST

Mohit Kamboj Tweet over Maharashtra Politics
पुन्हा खेला होबे! लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार, भाजपा नेत्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा गटाबद्दल केले 'हे' मोठे विधान
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्र राज्यात चार टप्प्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले आहे. आता येत्या 20 मे ला पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. अशातच भाजपामधील एका नेत्याने महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे विधान केले आहे.

Lok Sabha Election 2024 :  महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे ला होणार आहे. यानंतर देशभरातील लोकसभा निवडणुकीचे निकाल येत्या 4 जूनला जाहिर केले जाणार आहेत. अशातच भाजपामधील नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक मोठे विधान केले आहे. मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत महाराष्ट्रातील राजकणात मोठा भूकंप होण्याचा दावा केला आहे.

मोहित कंबोज यांची पोस्ट
सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मोहित कंबोज यांनी म्हटलेय की, 4 जून नंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) आणि शरद पवार (Shard Pawar) यांचा गट फुटणार आहे. दोन्ही पक्षामधील आमदार, नेते आणि कार्यकर्ते राजीनामा देतील. याशिवाय हे सर्वजण अन्य पक्षांच्या संपर्कात आहेत. ट्विटच्या अखेरीस फिर से खेला होबे असेही मोहित कंबोज यांनी म्हटले आहे.

मोहित कंबोज यांनी महाराष्ट्रातील राजकरणाबद्दल केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर आता सर्वांचे लक्ष उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या गटाकडे लागून राहिलेले आहे. यावर अद्याप दोन्ही पक्षाकडून काहीही उत्तर आलेले नाही. पण राजकीय चर्चांना मोहित कंबोज यांच्या विधानामुळे वेग आला आहे.

5 जूनला भाजपा फुटणार- उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत भाजपावर जोरदार टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, माझी मलाच चिंता नाहीये. माझ्यामागे तुमचे आशीर्वाद आहेत. तोवर मला कोणाचीही भीती नाही. मोदीजी तुम्ही भाजपाची चिंता करा. इंडिया आघाडीकडे किती चेहरे आहेत असा प्रश्न विचारता पण तुम्ही प्रत्येक वर्षी एकच पंतप्रधान देऊ असे म्हणता. तुम्ही पंतप्रधान नसाल तर भाजपाची स्थिती काय होते ते पाहा. येत्या 5 मे ला अर्धा भाजप पक्ष फुटल्याशिवाय राहणार नसल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सभेत म्हटले. तुम्ही सर्व गद्दार जमवले आहेत. सत्ता आल्यानंतर सर्व सूत्र आमच्या हाती असतील. तेव्हा पाहा स्थिती काय असेल.

आणखी वाचा : 

'बाळासाहेबांच्या वारशाचा अपमान', मुंबईत शिवसेनेच्या (UBT) मेळाव्यात इस्लामी ध्वज फडकवल्यानंतर संताप

उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Read more Articles on