MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Marathwada Rain Alert : मराठवाड्यासह राज्यात मुसळधार पावसाचा कहर; नद्यांना पूर, जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी

Marathwada Rain Alert : मराठवाड्यासह राज्यात मुसळधार पावसाचा कहर; नद्यांना पूर, जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी

Marathwada Rain Alert : मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नद्यांना पूर आला असून धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. नांदेड, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव, परभणी, गोंदिया जिल्ह्यांत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 27 2025, 09:20 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
मराठवाड्यात पुन्हा मुसळधार पावसाची हजेरी
Image Credit : Rajesh/x

मराठवाड्यात पुन्हा मुसळधार पावसाची हजेरी

मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नांदेड, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव, परभणी, गोंदिया आणि सोलापूर जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले असून नदी-नाल्यांचा प्रवाह वाढला आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत तर शहरातील सखल भाग जलमय झाले आहेत. ग्रामीण भागात उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांपुढे संकट उभं राहिलं आहे.

26
नांदेड जिल्ह्यात ढगफुटीसदृश पावसाचा कहर
Image Credit : Asianet News

नांदेड जिल्ह्यात ढगफुटीसदृश पावसाचा कहर

नांदेडमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. रस्ते जलमय झाले असून गोदावरी आणि आसना नद्यांची पातळी वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

Related Articles

Related image1
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला; मुंबई-ठाणेसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
Related image2
Dharashiv Flood : पूरग्रस्त धाराशिवमध्ये अधिकारी रंगल्या नवरात्र महोत्सवात; जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्स व्हिडिओवर संतापाची लाट
36
हिंगोलीत ओढ्यांना पूर, शेतात पाणी
Image Credit : ANI

हिंगोलीत ओढ्यांना पूर, शेतात पाणी

हिंगोली जिल्ह्यात दांडेगाव परिसरात ओढ्याला पूर आल्याने आजूबाजूच्या शेतात पाणी शिरले आहे. पिकांचे नुकसान झाले असून काही कुटुंबे सुरक्षित स्थळी हलवण्यात आली आहेत. शेतकरी नुकसानभरपाईची मागणी करत आहेत.

46
लातूर जिल्ह्यात रेणा प्रकल्पाचे दरवाजे उघडले
Image Credit : X

लातूर जिल्ह्यात रेणा प्रकल्पाचे दरवाजे उघडले

लातूर जिल्ह्यात रेणा मध्यम प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून 2,529 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

56
बीड, परभणीमधील स्थिती
Image Credit : Getty

बीड, परभणीमधील स्थिती

  • बीड जिल्ह्यात गोदावरी, सिंदफणा, बिंदुसरा आणि मांजरा नद्यांचा प्रवाह वाढला आहे. मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
  • मांजरा आणि माजलगाव धरणातून मोठा विसर्ग माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडून 42,000 क्युसेक्स आणि मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडून 27,166 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. यामुळे सिंदफणा आणि मांजरा नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे.
  • परभणीत पुन्हा पावसाचा कहर परभणी जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला असून नदी-नाल्यांना पाणी आले आहे. उरलेल्या पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.
66
धाराशिव, गोंदिया आणि सोलापूरची स्थिती
Image Credit : X

धाराशिव, गोंदिया आणि सोलापूरची स्थिती

  • धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
  • गोंदिया जिल्ह्यात धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे कापणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
  • सोलापूरात पूरस्थिती कायम सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला पूर आला आहे. गावांमध्ये पाणी साचल्याने सर्पदंशाच्या घटना घडत असून एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
महाराष्ट्र बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Nagpur Gudhi Padwa 2026 : नागपुरात गुढीपाडवा उत्साहात साजरा; हजारो नागरिकांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी
Recommended image2
Rajasthan Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात; पिंपरी-चिंचवडच्या तिघा तरुणांचा मृत्यू, लेह-लडाख ट्रिपवरून परतताना दुर्घटना
Recommended image3
Pimpri- Chinchwad Traffic Advisory : चिंचवडमध्ये ईदनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; चापेकर चौक परिसरात रस्ते बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग
Recommended image4
Maharashtra Weather Update: गुढीपाडव्याच्या आनंदावर अवकाळीचं सावट; महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांना 'हाय अलर्ट', तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?
Recommended image5
शिर्डीच्या साई प्रसादाला युद्धझळा! इराण युद्धाचा मोठा फटका; आशियातील सर्वात मोठ्या किचनमध्ये आता 'हा' बदल
Related Stories
Recommended image1
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला; मुंबई-ठाणेसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
Recommended image2
Dharashiv Flood : पूरग्रस्त धाराशिवमध्ये अधिकारी रंगल्या नवरात्र महोत्सवात; जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्स व्हिडिओवर संतापाची लाट
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved