MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला; मुंबई-ठाणेसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला; मुंबई-ठाणेसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पुणे घाटमाथा यांसह अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील ३ ते ४ दिवस राज्यभर मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 27 2025, 08:48 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
राज्यात पावसाचा जोर वाढला
Image Credit : Getty

राज्यात पावसाचा जोर वाढला

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, पुणे, सांगली, सोलापूरसह मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडत असून पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने शुक्रवार ते रविवारपर्यंत मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
हवामान विभागाचा अंदाज
Image Credit : ANI

हवामान विभागाचा अंदाज

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि चक्रीय स्थितीमुळे पुढील चार दिवस राज्यभर पावसाचे प्रमाण वाढणार आहे. काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत पावसाने विश्रांती घेतली होती, परंतु आता मुसळधार सरींनी हजेरी लावली असून दादरच्या शिवाजी पार्क परिसरात तासभरापासून पावसाला सुरुवात झाली आहे.

Related Articles

Related image1
Vidharbha Rain Alert : 'रागासा' चक्रीवादळाचा विदर्भावर धोका, हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Related image2
Dharashiv Flood : पूरग्रस्त धाराशिवमध्ये अधिकारी रंगल्या नवरात्र महोत्सवात; जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्स व्हिडिओवर संतापाची लाट
34
शेतकऱ्यांची चिंता वाढली
Image Credit : ANI

शेतकऱ्यांची चिंता वाढली

मुंबईकरांना उकाड्यातून दिलासा मिळत असला तरी ग्रामीण भागात मात्र या पावसामुळे पिकांचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. आधीच पावसामुळे शेतीचे नुकसान झालेले असताना आणखी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

44
अतिवृष्टीचा इशारा असलेले भाग
Image Credit : ANI

अतिवृष्टीचा इशारा असलेले भाग

रविवारी रायगड आणि पुणे घाटमाथा परिसरात दिवसभर संततधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने ज्या भागांसाठी इशारा दिला आहे त्यात –

  • मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा, नांदेड, लातूर, धाराशिव
  • मेघगर्जनेसह पाऊस : धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ
  • मुसळधार पाऊस : पालघर, नाशिक घाट परिसर, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
महाराष्ट्र बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Weather Update : मान्सूनने वेग धरला, महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट!
Recommended image2
Tukaram Mundhe | गुटखा विकणारे आणि खाणारे सावधान, तुकाराम मुंढे यांचा थेट इशारा
Recommended image3
दिल्लीत विद्यार्थ्यांचा एल्गार, 'कॉक्रोच' आंदोलनाच्या वेळी नेमकं काय घडलं?
Recommended image4
नवी मुंबई विमानतळाला ऐतिहासिक ओळख; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण
Recommended image5
महागाईचा फटका सलून सेवांवरही; महाराष्ट्रात दाढी-कटिंगच्या दरात 20 टक्के वाढ, सर्वसामान्यांचा खिसा आणखी हलका
Related Stories
Recommended image1
Vidharbha Rain Alert : 'रागासा' चक्रीवादळाचा विदर्भावर धोका, हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Recommended image2
Dharashiv Flood : पूरग्रस्त धाराशिवमध्ये अधिकारी रंगल्या नवरात्र महोत्सवात; जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्स व्हिडिओवर संतापाची लाट
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved