Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधी याचिकांवर आजपासून हायकोर्टात सुनावणी

| Published : Jun 13 2024, 10:38 AM IST / Updated: Jun 13 2024, 10:42 AM IST

Supreme court's big decision - reservation given to Maratha community unconstitutional

सार

Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर आजपासून हायकोर्टात सुनावणी होणार आहे. डॉ. जयश्री पाटील यांनी १० टक्के मराठा आरक्षणाला विरोध करत दिवाणी रिट याचिका दाखल केली होती.

 

Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर आजपासून हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठापुढे सुनावणी होणार आहे. डॉ. जयश्री पाटील यांनी १० टक्के मराठा आरक्षणाला विरोध करत दिवाणी रिट याचिका दाखल केलीय. राज्य सरकारनं मराठा आरक्षणानुसार केलेली सरकारी नोकर भरती आणि वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून राहतील, असा हायकोर्टाने म्हटलंय. तर विनोद पाटील यांच्यावतीने मराठा आरक्षणाला समर्थन देत कॅवेट दाखल करण्यात आलंय. हे आरक्षण कोर्टात टिकेल, असा दावा राज्य सरकारने केला आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालवत चालली आहे. दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी उपचार घेतले होते. पण सरकार जोपर्यंत तोडगा काढणार नाही, तोपर्यंत उपचार घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबतचा तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत.

सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरावाली सराटी येथे दाखल होणार आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्याविषयी चर्चा करण्यात येणार असल्याचं समजतेय.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्याबाबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. आज सरकारचे शिष्टमंडळ आंतरावली सराटीमध्ये दाखल होणार आहे. राज्य सरकारच्यावतीने मंत्री शंभूराजे देसाई येणार आहेत. दुपारी एक वाजता शंभूराजे देसाई मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार आहेत. मनोज जरांगे यांच्या मागण्याबाबत ते चर्चा करणार आहेत. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी शंभूराजे देसाई प्रयत्न करणार आहेत.

आणखी वाचा :

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इटली दौरा, G-7 परिषदेमध्ये होणार सहभागी, जाणून घ्या प्रमुख अजेंड्याबद्दल सविस्तर...