सार
महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये सर्व पक्षांच्या उपस्थितीत पार पडली आहे. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले हे उपस्थित होते.
महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये सर्व पक्षांच्या उपस्थितीत पार पडली आहे. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले हे उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी महाविकास आघाडीची माहिती दिली आहे. लोकसभा निवडणूक 2024 साठी अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असून शिवसेना 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार आहे.
महाविकास आघाडी आज सकाळी अकरा वाजता सभा पार पडली आहे. मुंबईच्या मंत्रालय परिसरात ठाकरे गटाच्या कार्यालयात ही बैठक पार पडली आहे. यात महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर करण्यात आले आहे. कोणत्या पक्षाला किती जागा देण्यात आल्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.
काँग्रेसच्या 17 जागा
- नंदूरबार
- धुळे
- अकोला
- अमरावती
- नागपूर
- भंडारा-गोंदिया
- गडचिरोली-चिमूर
- चंद्रपूर
- नांदेड
- जालना
- मुंबई उत्तर मध्य
- उत्तर मुंबई
- सोलापूर
- कोल्हापूर
- रामटेक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 जागा
- बारामती
- शिरुर
- सातारा
- भिवंडी
- दिंडोरी
- माढा
- रावेर
- वर्धा
- अहमदनगर दक्षिण
- बीड
शिवसेना ठाकरे गटाच्या 21 जागा
- दक्षिण मुंबई
- दक्षिण मध्य मुंबई
- उत्तर पश्चिम मुंबई (North West)
- मुंबई ईशान्य
- जळगाव
- परभणी
- नाशिक
- पालघर
- कल्याण
- ठाणे
- रायगड
- मावळ
- धाराशीव
- रत्नागिरी
- बुलढाणा
- हातकणांगले
- संभाजीनगर
- शिर्डी
- सांगली
- हिंगोली
- यवतमाळ
- वाशिम
आणखी वाचा
महाविकास आघाडीची आज संयुक्त पत्रकार परिषद, सांगली आणि भिवंडीच्या जागेचा तिढा सुटणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची का सोडली साथ? उद्धव ठाकरे नेत्यांना द्यायचे अशी वागणूक