MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Weather Update: महाराष्ट्रावर पुन्हा वरुणराजाची वक्रदृष्टी! पुढील २४ तासांत 'या' ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रावर पुन्हा वरुणराजाची वक्रदृष्टी! पुढील २४ तासांत 'या' ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: हवामान विभागाने वाऱ्याची दिशा बदलल्याने विदर्भातील ८ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला असून, मराठवाड्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Apr 05 2026, 09:36 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
महाराष्ट्रावर पुन्हा वरुणराजाची वक्रदृष्टी! पुढील २४ तासांत 'या' ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Image Credit : Meta AI

महाराष्ट्रावर पुन्हा वरुणराजाची वक्रदृष्टी! पुढील २४ तासांत 'या' ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका जाणवत असतानाच आता पुन्हा एकदा निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत वाऱ्याची दिशा बदलल्याने राज्याच्या काही भागांत अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने (IMD) ६ एप्रिल रोजी विदर्भातील ८ जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी केला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

24
विदर्भात पावसाचा जोर, ८ जिल्ह्यांत यलो अलर्ट
Image Credit : ANI

विदर्भात पावसाचा जोर, ८ जिल्ह्यांत यलो अलर्ट

विदर्भावर पावसाचे ढग दाटले असून सोमवारी नागपूर आणि अमरावतीसह ८ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता आहे.

वारा: ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता.

परिस्थिती: पुढील काही दिवस विदर्भात हीच स्थिती कायम राहू शकते, त्यामुळे शेतीकामांचे नियोजन काळजीपूर्वक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Related Articles

Related image1
Majhi Kanya Bhagyashree Yojana: लेक लाडकी 'लखपती' होणार! 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेतून मुलींच्या भविष्यासाठी मिळताहेत लाखो रुपये; पाहा अटी आणि फायदे
Related image2
Shetkari Karjmafi Update: शेतकरी कर्जमाफीचा 'फायनल काऊंटडाऊन'! २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार; पण 'या' जाचक अटींचे काय? वाचा सविस्तर
34
विभागवार हवामान अंदाज
Image Credit : Getty

विभागवार हवामान अंदाज

मराठवाडा: बहुतांश भागात हवामान कोरडे असले तरी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावू शकतो.

पश्चिम महाराष्ट्र: या भागात उष्णतेची लाट जाणवेल, मात्र सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात. तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.

कोकण किनारपट्टी: मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता कमी असली तरी हवेतील आर्द्रता वाढल्याने उकाडा जाणवेल. येथे कमाल तापमान ३४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र: खान्देश आणि परिसरात हवामान पूर्णपणे कोरडे राहील. मात्र, कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने उन्हाचा चटका अधिक तीव्र असेल. 

44
शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
Image Credit : freepik

शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

हवामानातील या अचानक बदलामुळे विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी काढणीला आलेला माल सुरक्षित स्थळी हलवावा. वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली किंवा पत्राच्या शेडखाली आश्रय घेणे टाळावे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या
मुंबई बातम्या
पुण्याच्या बातम्या
छ. संभाजीनगर बातम्या
कोल्हापूर बातम्या
विदर्भातील बातम्या
नाशिक बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर; ‘गॉडझिला एल निनो’चा इशारा, 18-19 एप्रिलला पावसाची शक्यता
Recommended image2
Maharashtra SSC-HSC Board Results : 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट; ‘या’ तारखांना जाहीर होण्याची शक्यता
Recommended image3
Vande Bharat Sleeper Train : बंगळूरु-पुणे वंदे भारत स्लीपरला मंजुरी, जाणून घ्या मार्ग आणि वेळापत्रकाबद्दल सर्वकाही
Recommended image4
TCS Nashik Row : 'मूल हवंय तर बायकोला पाठव'; TCS कर्मचाऱ्याच्या आरोपाने खळबळ
Recommended image5
CBSE 10th Class Results : सीबीएसी बोर्ड परीक्षेत 93.70% विद्यार्थी पास; मुलींची पुन्हा बाजी, टॉपर्स लिस्टला ब्रेक
Related Stories
Recommended image1
Majhi Kanya Bhagyashree Yojana: लेक लाडकी 'लखपती' होणार! 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेतून मुलींच्या भविष्यासाठी मिळताहेत लाखो रुपये; पाहा अटी आणि फायदे
Recommended image2
Shetkari Karjmafi Update: शेतकरी कर्जमाफीचा 'फायनल काऊंटडाऊन'! २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार; पण 'या' जाचक अटींचे काय? वाचा सविस्तर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved