MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Weather Update: राज्यात निसर्गाचा 'डबल अटॅक'! १० जिल्ह्यांना यलो अलर्ट; कुठे उन्हाचा चटका, तर कुठे गारपिटीचं संकट?

Maharashtra Weather Update: राज्यात निसर्गाचा 'डबल अटॅक'! १० जिल्ह्यांना यलो अलर्ट; कुठे उन्हाचा चटका, तर कुठे गारपिटीचं संकट?

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात एकाच वेळी उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचे दुहेरी संकट आले आहे. हवामान विभागाने कोकणात उष्ण व दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज वर्तवत १० जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 22 2026, 09:29 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
राज्यात निसर्गाचा 'डबल अटॅक'! १० जिल्ह्यांना यलो अलर्ट
Image Credit : freepik

राज्यात निसर्गाचा 'डबल अटॅक'! १० जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई: महाराष्ट्राच्या हवामानात सध्या कमालीची उलथापालथ पाहायला मिळत आहे. एका बाजूला अंगाची लाहीलाही करणारी उष्णतेची लाट, तर दुसऱ्या बाजूला विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचे सावट, अशा दुहेरी संकटात राज्य सापडले आहे. हवामान विभागाने पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत १० जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी केला आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
१. कोकण किनारपट्टी: उकाड्याने अंगाची होणार लाहीलाही
Image Credit : Getty

१. कोकण किनारपट्टी: उकाड्याने अंगाची होणार लाहीलाही

मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात पावसाचा धोका टळला असला तरी 'उष्ण आणि दमट' हवामानाचे नवे संकट उभे राहिले आहे.

यलो अलर्ट: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग.

परिस्थिती: तापमानाचा पारा ३१ अंश सेल्सिअसपर्यंत जाणार असला तरी हवेतील आर्द्रतेमुळे (Humidity) प्रचंड उकाडा जाणवेल. नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Related Articles

Related image1
Pune Water Cut Update: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात 'या' भागांचा पाणीपुरवठा बंद; महापालिकेचं महत्त्वाचं आवाहन
Related image2
हर्षवर्धन सद्गीरचा ऐतिहासिक पराक्रम! 'बाहुबली'ला आस्मान दाखवत कोरलं 'डबल महाराष्ट्र केसरी' पदावर नाव; बक्षिसांचा वर्षाव
35
२. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा: वादळी वारे अन् विजांचा कडकडाट
Image Credit : Gemini

२. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा: वादळी वारे अन् विजांचा कडकडाट

या भागात 'अस्मानी संकट' पुन्हा घोंघावत आहे. सोमवारी दुपारनंतर हवामानात मोठे बदल होतील.

वादळी पाऊस: सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहून विजांसह पावसाची शक्यता आहे.

मराठवाडा अलर्ट: लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा असून बीड, हिंगोली आणि नांदेडमध्ये हलक्या सरी कोसळतील.

पुणे व अहिल्यानगर: पुण्यात पारा ३३ अंशांवर जाईल, तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

45
३. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र: 'हीट वेव्ह'ची चाहूल
Image Credit : Getty

३. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र: 'हीट वेव्ह'ची चाहूल

विदर्भात तूर्तास पावसाची शक्यता नसली तरी उन्हाचा तडाखा वाढणार आहे.

विदर्भ: अमरावती, नागपूरसह विदर्भात पारा ३७ अंशांच्या पार जाण्याची शक्यता आहे. २५ मार्चपासून या भागात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा देण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र: नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होऊन कोरडे हवामान राहील. 

55
शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वाच्या टिप्स
Image Credit : social media

शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वाच्या टिप्स

शेतकरी: काढणीला आलेल्या पिकांचे आणि फळबागांचे वादळी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी तातडीने नियोजन करा.

नागरीक: दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना पुरेसे पाणी प्या. उष्ण आणि दमट हवामानामुळे डिहायड्रेशनचा धोका टाळा.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या
मुंबई बातम्या
पुण्याच्या बातम्या
कोल्हापूर बातम्या
विदर्भातील बातम्या
नाशिक बातम्या
छ. संभाजीनगर बातम्या

Recommended Stories
Recommended image1
अजित पवार गटाच्या नेत्याचा मागितला राजीनामा, नेमकं पक्षात काय घडलं?
Recommended image2
पुढील ९ दिवस धोक्याचे, या काळात नेमकं काय होणार?
Recommended image3
ठाण्याच्या खासदार नरेश म्हस्केंना सलग दुसऱ्यांदा ‘संसद रत्न’ पुरस्कार; खासदार श्रीकांत शिंदेंचाही सन्मान
Recommended image4
Maharashtra : वाशिममध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारींचा भाजपमध्ये प्रवेश
Recommended image5
बच्चू कडूंचा ठाकरेंवर पलटवार, उद्धव ठाकरेंनी फसवल्याचा केला दावा
Related Stories
Recommended image1
Pune Water Cut Update: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात 'या' भागांचा पाणीपुरवठा बंद; महापालिकेचं महत्त्वाचं आवाहन
Recommended image2
हर्षवर्धन सद्गीरचा ऐतिहासिक पराक्रम! 'बाहुबली'ला आस्मान दाखवत कोरलं 'डबल महाराष्ट्र केसरी' पदावर नाव; बक्षिसांचा वर्षाव
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved