MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Pune Water Cut Update: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात 'या' भागांचा पाणीपुरवठा बंद; महापालिकेचं महत्त्वाचं आवाहन

Pune Water Cut Update: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात 'या' भागांचा पाणीपुरवठा बंद; महापालिकेचं महत्त्वाचं आवाहन

Pune Water Cut Update: पुणे विद्यापीठ चौकातील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे मंगळवारी २४ मार्चला शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सेनापती बापट रोड, कोथरूड, शिवाजीनगर आणि औंध-बाणेर यांसारख्या परिसरांना याचा फटका बसेल. 

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 22 2026, 07:42 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात 'या' भागांचा पाणीपुरवठा बंद
Image Credit : Getty

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात 'या' भागांचा पाणीपुरवठा बंद

पुणे: पुण्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच आता पुणेकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे. पुणे विद्यापीठ चौक परिसरातील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे तातडीचे काम हाती घेण्यात आल्याने शहरातील अनेक प्रमुख भागांचा पाणीपुरवठा मंगळवारी (२४ मार्च) बंद राहणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
पाणी कपात का?
Image Credit : Getty

पाणी कपात का?

शहराचा पाणीपुरवठा भविष्यकाळात सुरळीत राहावा आणि जलवाहिन्यांची क्षमता टिकून राहावी, यासाठी ही देखभाल-दुरुस्ती अनिवार्य असल्याचे पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. दुरुस्तीच्या कामावेळी पाण्याचा दाब नियंत्रित करण्यासाठी आणि तांत्रिक कामे सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Related Articles

Related image1
Women Safety: महिलांनो, आता घाबरू नका! एका क्लिकवर मिळणार न्याय; राज्य सरकारचे 'महिला सन्मान पोर्टल' सुरू, घरी बसून नोंदवा तक्रार
Related image2
Duronto Express: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! दुरांतो एक्स्प्रेस आता नव्या रूपात धावणार; गर्दीचं टेन्शन मिटणार, पाहा काय बदलले?
35
'या' भागांत मंगळवारी नळ येणार नाहीत!
Image Credit : Getty

'या' भागांत मंगळवारी नळ येणार नाहीत!

२४ मार्च रोजी खालील परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल

सेनापती बापट रोड: डावी आणि उजवी दोन्ही बाजू.

कोथरुड-गोखले नगर परिसर: आशानगर, गोखले नगर, बहिराटवाडी.

शिवाजीनगर भाग: मॉडेल कॉलनी, मॉडर्न कॉलेज परिसर.

औंध-बाणेर पट्टा: औंध, बाणेर, बोपोडी, चिखलवाडी.

इतर भाग: भोसले नगर, कासारकर वाडी. 

45
प्रशासनाचे नियोजन आणि आवाहन
Image Credit : Getty

प्रशासनाचे नियोजन आणि आवाहन

मंगळवारी दिवसभर काम चालल्यानंतर बुधवारी (२५ मार्च) सकाळी या सर्व भागांत पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे. मात्र, पुरवठा सुरू झाल्यावर सुरुवातीला पाण्याचा दाब कमी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

55
महत्त्वाची सूचना
Image Credit : Getty

महत्त्वाची सूचना

"उन्हाळा असल्याने पाण्याची गरज जास्त असते, हे लक्षात घेऊन नागरिकांनी आदल्या दिवशीच आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा. महापालिकेला या देखभाल कार्यात सहकार्य करावे," असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
पुण्याच्या बातम्या

Recommended Stories
Recommended image1
अजित पवार गटाच्या नेत्याचा मागितला राजीनामा, नेमकं पक्षात काय घडलं?
Recommended image2
पुढील ९ दिवस धोक्याचे, या काळात नेमकं काय होणार?
Recommended image3
ठाण्याच्या खासदार नरेश म्हस्केंना सलग दुसऱ्यांदा ‘संसद रत्न’ पुरस्कार; खासदार श्रीकांत शिंदेंचाही सन्मान
Recommended image4
Maharashtra : वाशिममध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारींचा भाजपमध्ये प्रवेश
Recommended image5
बच्चू कडूंचा ठाकरेंवर पलटवार, उद्धव ठाकरेंनी फसवल्याचा केला दावा
Related Stories
Recommended image1
Women Safety: महिलांनो, आता घाबरू नका! एका क्लिकवर मिळणार न्याय; राज्य सरकारचे 'महिला सन्मान पोर्टल' सुरू, घरी बसून नोंदवा तक्रार
Recommended image2
Duronto Express: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! दुरांतो एक्स्प्रेस आता नव्या रूपात धावणार; गर्दीचं टेन्शन मिटणार, पाहा काय बदलले?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved