समृद्धी महामार्गावर अमरावती जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. पावसामुळे समोरचे न दिसल्याने एका कारने ट्रकला धडक दिली, ज्यात एका चिमुकलीसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही कार चंद्रपूरवरून मुंबईच्या दिशेने जात होती.
आयुष्यात कधी कोणाचं काय होईल सांगता येत नाही. आता चांगल्या महामार्गामुळं दळणवळण सोपं झालं आहे. आता परत एकदा समृद्धी महामार्गावर दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात एका चिमूलकीचा मृत्यू झाला. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या सावटात पडला आहे. सगळीकडं अपघाताबद्दल हळहळ व्यक्त केली जातेय.

नेमकं अपघात कसा झाला?
आपण आता अपघात कसा झाला ते जाणून घेऊयात. अमरावती जिल्ह्यात चॅनल नंबर १०५ जवळ हा भीषण अपघात झाला. कार ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की कारमधील पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला यांचा या मृतांमध्ये समावेश झाला आहे.
टोलनाका परिसरात झाला होत
अपघात वॅगनर कारमध्ये बसून चंद्रपूरवरून मुंबईच्या दिशेने गाडी चालली होती. मात्र पावसाच्या वेळेला समोरच न दिसल्यामुळं गाडीनं ट्रकला धडक दिली. या कारची धडक एवढी भयानक होती की जागेवरच गाडीतील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. हि घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. अपघातात मृत्यू पावलेल्या लोकांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना केली जात आहे.
