खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. पक्षांतराचा निर्णय म्हणजे विष पचवण्यासारखं असून, मतदारसंघाचा मागासलेपणाचा शिक्का पुसण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी बोलताना ते भावुक झाले होते.
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला रामराम करून खा. ओमराजे निंबाळकर यांनी सोडचिट्ठी दिली. त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. पक्षांतराचा निर्णय घेणं म्हणजे विष पचवण्यासारखं असल्याचं यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं. यावेळी निंबाळकर भावुक झाल्याचं दिसून आलं आहे.

ओमराजे निंबाळकर यांनी काय म्हटले?
ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे की, मी हा जो निर्णय घेतलाय, ते म्हणजे विष पचवण्यासारखं आहे. यावेळी १० दिवसांत माझ्यावर जी टीका होतेय ती कोणत्याही सामान्य माणसाला सहन होणारी नाही. ते मी सगळं सहन केलं आहे. मला माझ्या मागासलेपणाचा शिक्का पुसून काढायचाय असं मत त्यांनी व्यक्त केलं.
उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
उद्धव ठाकरेंबद्दल यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी मत व्यक्त केलं आहे. ओमराजे यावेळी म्हटले की, उद्धव ठाकरे माझ्या मनात जो आदर आहे. त्यातही मी कुठंही त्यांच्यावर दोषारोप केलेले नाहीत. मी माझ्या मतदारसंघात लोकांना ज्या अडचणी येत आहेत, त्यामुळं हा निर्णय घेतलाय. किती दिवस मागास असलेला मतदारसंघ हा शिक्का पुसून काढायचंय.
