MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Weather Alert: महाराष्ट्रावर 'डबल अटॅक'! एका बाजूला सूर्याचा आगडोंब, तर दुसरीकडे पावसाचा इशारा; वाचा तुमच्या शहराची स्थिती

Weather Alert: महाराष्ट्रावर 'डबल अटॅक'! एका बाजूला सूर्याचा आगडोंब, तर दुसरीकडे पावसाचा इशारा; वाचा तुमच्या शहराची स्थिती

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रामध्ये हवामानाचे दुहेरी रूप पाहायला मिळतय, कोकण, मुंबई, मराठवाडा उष्णतेच्या लाटेने त्रस्त आहे. दुसरीकडे हवामान खात्याने विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांत १३ मार्चला मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट जारी केला.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 12 2026, 09:57 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
एका बाजूला सूर्याचा आगडोंब, तर दुसरीकडे पावसाचा इशारा
Image Credit : Asianet News

एका बाजूला सूर्याचा आगडोंब, तर दुसरीकडे पावसाचा इशारा

मुंबई: राज्याच्या हवामानात सध्या कमालीची उलथापालत पाहायला मिळत आहे. कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांसमोर आता निसर्गाचे दुहेरी संकट उभे ठाकले आहे. एकीकडे पारा ३९ अंशांच्या पार जात असतानाच, हवामान खात्याने १३ मार्च रोजी काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
विदर्भात पावसाची एन्ट्री, तर कोकण भाजून निघणार!
Image Credit : Asianet News

विदर्भात पावसाची एन्ट्री, तर कोकण भाजून निघणार!

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, विदर्भातील काही भागांत पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित महाराष्ट्र उन्हाच्या चटक्यांनी होरपळणार आहे. 

Related Articles

Related image1
मुंबईवर इंधन संकटाचे सावट! पेट्रोल-डिझेल ५० दिवस पुरेल, पण CNG चे काय? १२ लाख वाहनचालकांची धाकधूक वाढली
Related image2
अजित पवारांच्या अपघात प्रकरणाचा तपास आता दिल्लीतून? रोहित पवारांची राहुल गांधींशी भेट; मिळाला 'मोलाचा' शब्द!
37
१. विदर्भ: मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
Image Credit : Asianet News

१. विदर्भ: मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक तापमान (३६-४०°C) नोंदवले जात आहे. मात्र, १३ मार्च रोजी यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. येथे विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सतर्क राहावे. 

47
२. कोकण आणि मुंबई: उकाड्याने अंगाची लाहीलाही
Image Credit : Asianet News

२. कोकण आणि मुंबई: उकाड्याने अंगाची लाहीलाही

मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये उष्णतेची लाट कायम आहे.

तापमान: कमाल ३४-३८°C, किमान २४-२७°C.

स्थिती: हवेतील आर्द्रता (Humidity) जास्त असल्याने प्रत्यक्ष तापमानापेक्षा उकाडा अधिक तीव्र जाणवेल. या भागांसाठी उष्णतेचा 'यलो अलर्ट' कायम आहे. 

57
३. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र: कोरडे व तापलेले हवामान
Image Credit : ANI

३. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र: कोरडे व तापलेले हवामान

पुणे व पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, कोल्हापूर भागात हवामान पूर्णपणे कोरडे राहील. पुण्यात कमाल तापमान ३८°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

नाशिक विभाग: उत्तर महाराष्ट्रातही तापमानाचा आलेख उंचावलेलाच असेल. दिवसा उन्हाचे चटके तर रात्री काहीसा दिलासा मिळेल. 

67
४. मराठवाडा: उष्णतेचा पारा ३९ अंशांवर
Image Credit : ANI

४. मराठवाडा: उष्णतेचा पारा ३९ अंशांवर

छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर आणि धाराशिवमध्ये उन्हाची तीव्रता अधिक असेल. येथे कमाल तापमान ३९ अंशांपर्यंत पोहोचल्याने दुपारी घराबाहेर पडणे कठीण होणार आहे. 

77
स्वतःचा बचाव कसा कराल? (Health Tips)
Image Credit : Getty

स्वतःचा बचाव कसा कराल? (Health Tips)

हायड्रेटेड राहा: तहान लागलेली नसली तरीही भरपूर पाणी, लिंबू सरबत किंवा ताक प्या.

थेट सूर्यप्रकाश टाळा: दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळा. बाहेर जाताना डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करा.

पावसाची पूर्वतयारी: विदर्भातील नागरिकांनी विजा चमकत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मुंबई बातम्या
पुण्याच्या बातम्या
कोल्हापूर बातम्या
विदर्भातील बातम्या
नाशिक बातम्या
छ. संभाजीनगर बातम्या
Recommended Stories
Recommended image1
दिल्लीत विद्यार्थ्यांचा एल्गार, 'कॉक्रोच' आंदोलनाच्या वेळी नेमकं काय घडलं?
Recommended image2
नवी मुंबई विमानतळाला ऐतिहासिक ओळख; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण
Recommended image3
महागाईचा फटका सलून सेवांवरही; महाराष्ट्रात दाढी-कटिंगच्या दरात 20 टक्के वाढ, सर्वसामान्यांचा खिसा आणखी हलका
Recommended image4
Pune : पुण्यातील जत्रेत 'मेड इन पाकिस्तान' चादर, धुतल्यावर सत्य समोर आल्याने खळबळ!
Recommended image5
अमित ठाकरे यांचे कॉकरोच जनता पार्टीबद्दल केलं मोठे वक्तव्य, '...तर मला आनंद होईल'
Related Stories
Recommended image1
मुंबईवर इंधन संकटाचे सावट! पेट्रोल-डिझेल ५० दिवस पुरेल, पण CNG चे काय? १२ लाख वाहनचालकांची धाकधूक वाढली
Recommended image2
अजित पवारांच्या अपघात प्रकरणाचा तपास आता दिल्लीतून? रोहित पवारांची राहुल गांधींशी भेट; मिळाला 'मोलाचा' शब्द!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved