MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • महाराष्ट्रावर दुहेरी संकट! अवकाळीचा मुक्काम हलणार, पण आता 'हीट वेव्ह'चा तडाखा; जाणून घ्या पुढच्या 48 तासांचा अलर्ट

महाराष्ट्रावर दुहेरी संकट! अवकाळीचा मुक्काम हलणार, पण आता 'हीट वेव्ह'चा तडाखा; जाणून घ्या पुढच्या 48 तासांचा अलर्ट

Maharashtra weather update: महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी संकट टळलेले नाही. हवामान विभागाने विदर्भात पावसाचा 'यलो अलर्ट' कायम ठेवला आहे, तर दुसरीकडे कोकण, मुंबईसह अनेक भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 20 2026, 09:53 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
महाराष्ट्रावर दुहेरी संकट! अवकाळीचा मुक्काम हलणार, पण आता 'हीट वेव्ह'चा तडाखा
Image Credit : Gemini AI

महाराष्ट्रावर दुहेरी संकट! अवकाळीचा मुक्काम हलणार, पण आता 'हीट वेव्ह'चा तडाखा

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या अवकाळी पावसाचा जोर आता काहीसा ओसरताना दिसत आहे. मात्र, पावसाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाही, तोच आता राज्यावर उष्णतेच्या लाटेचे (Heat Wave) सावट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी महत्त्वाचा इशारा दिला असून, काही भागांत पावसाची तर काही भागांत उकाड्याची तीव्रता वाढणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
विदर्भात पावसाचा 'यलो अलर्ट' कायम
Image Credit : Gemini

विदर्भात पावसाचा 'यलो अलर्ट' कायम

विदर्भातील जिल्ह्यांसाठी अद्याप धोका टळलेला नाही. नागपूरसह भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात तापमानाचा पारा ३२ ते ४० अंशांच्या दरम्यान राहील. 

Related Articles

Related image1
महाराष्ट्राची मान जगात उंचावली! मुंबई-पुणे मार्गावर इंजिनिअरिंगचा असा चमत्कार, जो आता थेट 'गिनीज बुकात' झळकणार!
Related image2
नाशिककर लक्ष द्या! रमजान ईदनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' पर्यायी मार्ग तपासा
36
कोकण आणि मुंबई: आता घामाच्या धारा!
Image Credit : Getty

कोकण आणि मुंबई: आता घामाच्या धारा!

मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आता अवकाळीचे ढग गायब झाले असून उष्ण आणि कोरडे हवामान राहील. २२ मार्चपासून उन्हाचा कडाका वाढणार असून, हवामान विभागाने येथे 'उष्ण आणि दमट' हवामानाचा यलो अलर्ट दिला आहे. तापमानाचा पारा ३४ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. 

46
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा: कुठे ऊन, कुठे पाऊस?
Image Credit : Social Media

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा: कुठे ऊन, कुठे पाऊस?

पुणे-सातारा: येथे पाऊस विश्रांती घेईल आणि हवामान कोरडे राहील.

कोल्हापूर, सांगली, सोलापूर: या भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. सोलापुरात ४८ तासांनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो.

मराठवाडा: छत्रपती संभाजीनगरमध्ये हवामान कोरडे राहील, मात्र लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. 

56
उत्तर महाराष्ट्र: उन्हाची ताप वाढणार
Image Credit : our own

उत्तर महाराष्ट्र: उन्हाची ताप वाढणार

नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार भागात आता पावसाचे संकट ओसरले आहे. या जिल्ह्यांमध्ये आता हवामान प्रामुख्याने कोरडे राहील आणि कमाल तापमान ३६ अंशांपर्यंत पोहोचू शकते.

66
महत्त्वाची टीप
Image Credit : Getty

महत्त्वाची टीप

एका बाजूला विदर्भात विजांचा कडकडाट, तर दुसऱ्या बाजूला कोकण-उत्तर महाराष्ट्रात वाढता उकाडा अशा विचित्र हवामानामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि गरज असेल तरच उन्हात बाहेर पडावे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मुंबई बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या
कोल्हापूर बातम्या
पुण्याच्या बातम्या
विदर्भातील बातम्या
नाशिक बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला ब्रेक, 24 जूननंतर दिलासा मिळण्याची शक्यता
Recommended image2
Operation Tiger | ऑपरेशन टायगर यशस्वी? उबाठाच्या बैठकीला हे 6 खासदार गैरहजर, दिल्लीत हालचालींना वेग
Recommended image3
Monsoon Update : महाराष्ट्रातील मान्सूनचा वेग पुन्हा मंदावला; हवामान खात्याकडून पुढील ४ ते ५ दिवसांसाठी महत्त्वाचा अंदाज
Recommended image4
UBT Meeting Today : ऑपरेशन टायगर फसलं तर नाही ना? कोण कुणाबरोबर आणि कोण कुणाबरोबर नाही, आज उबाठाची संसदीय दलाची बैठक, चित्र स्पष्ट होणार
Recommended image5
BEST Bus Strike : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! 19 जूनपासून बेस्ट बससेवा ठप्प होण्याची शक्यता
Related Stories
Recommended image1
महाराष्ट्राची मान जगात उंचावली! मुंबई-पुणे मार्गावर इंजिनिअरिंगचा असा चमत्कार, जो आता थेट 'गिनीज बुकात' झळकणार!
Recommended image2
नाशिककर लक्ष द्या! रमजान ईदनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' पर्यायी मार्ग तपासा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved