Bhima River Boat Accident: 40 तासानंतर शोधकार्य संपलं, 6 वा मृतदेह सापडला

| Published : May 23 2024, 01:09 PM IST

ujani boat

सार

भीमा नदी पात्रात बोट बुडाली या दुर्घटनेतील सहावा मृतदेह सापडला आहे. सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी हा मृतदेह सापडला आहे. सर्व सहाच्या सहा मृतदेह मिळाले आहेत.

 

भीमा नदी पात्रात बोट बुडाल्याच्या दुर्घटनेतील सहावा मृतदेह सापडला आहे. सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी हा मृतदेह सापडला आहे. सर्व सहाच्या सहा मृतदेह मिळाले आहेत. तब्बल 40 तासांच्या शोध मोहीमेनंतर सुरु असणारं शोधकार्य संपलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून शोधकार्य सुरु होतं. अखेर आज सर्व मृतदेह NDRF च्या हाती आले आहेत.

दुर्घटनेतील मृतांची नावे

1) गोकूळ दत्तात्रय जाधव (वय 30)

2) कोमल गोकूळ जाधव (वय 25)

3) शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष)

4) माही गोकूळ जाधव (वय 3 वर्ष )

हे सर्व मृत प्रवाशी हे राहणार झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर

1) अनुराग अवघडे (वय 35)

2) गौरव डोंगरे (वय 16)

हे दोन्ही मृत प्रवाशी हे कुगाव येथील आहेत.

21 मे ला सायंकाळी घडली होती दुर्घटना

ही दुर्घटना 21 मे ला सायंकाळी घडली होती. त्यादिवशी डोंगरे व जाधव कुटुंब इंदापूर तालुक्यातील अजोती येथे पाहुण्याच्या जागरण गोंधळ कार्यक्रमाला निघाले होते. हे सर्व प्रवासी कुगावकडून कळाशीच्या दिशेने जाणाऱ्या बोटेत होते. बोट मध्यभागी नदीपात्रात आल्यानंतर अचानक हलका पाऊस आणि जोरदार वारा सुटला. त्यामुळं रौद्ररुप धारण केलेल्या लाटांचे पाणी बोटीत शिरले आणि बोट जागेवर फिरली. बोटीत पाणी शिरल्यानं ही घटना घडली. यामध्ये सहा प्रवाशी बुडाले होते. काल दिवसभर शोधकार्य करुनसुद्ध एकही मृतदेह हाती लागला नव्हता. मात्र, आज सकाळी पाच मृतदेह NDRF च्या जवानांना सापडले होते. त्यानंतर राहिलेला एक मृतदेह देखील शोधण्यात NDRF च्या जवानांना यश आलं आहे. अखेर 40 तासानंतर NDRF चे शोधकार्य संपले आहे.

आणखी वाचा:

SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली, 3 जवानांचा मृत्यू