SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली, 3 जवानांचा मृत्यू

| Published : May 23 2024, 10:58 AM IST

Akole Pravara river boat accident

सार

अहमदनगरमध्ये बुडालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफच्या पथकाची बोट उलटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उजनी बोट दुर्घटना ताजी असतानाच अहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील प्रवरा नदीत एसडीआरएफ पथकाची बोट उलटली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून तिघांचा शोध सुरु आहे. प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफचे पथक आणि एक स्थानिक असे एकूण सहाजण बोटीतून गेले होते. मात्र बोट उलटल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला तर तिघे बेपत्ता झाले आहेत. उर्वरित तिघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. उजनी बोट दुर्घटना ताजी असतानाच अहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये मंगळवारी वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोट बुडून सहा जण बेपत्ता झाले होते. २० तासांच्या शोधानंतर त्यातील पाच जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.