सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 23 ऑगस्टच्या प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, असं म्हणत महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली आहे. आज मुंबईत हुतात्मा चौकपासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत महाविकास आघाडी आंदोलन करत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन केले जात आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

२. राज्यात आजपासून पुन्हा जोरधारांचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुढील तीन ते चार दिवस गुजरात किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या चक्रीवादळाने राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. मराठवाड्यातही पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान, आज मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याला जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

३. सप्टेंबर महिन्यातील बँकेला एकूण 15 दिवस सुट्ट्या असणार आहेत. रिझर्व्ह बँकेने सुट्ट्यांची ही यादी जारी केली आहे.

४. आजपासून गॅस लिंडरच्या दरात बदल झाला आहे. संपूर्ण भारतात आता गॅस सिलिंडरचे नव दर लागू झाले आहेत. मुंबईतही गॅस सिलिंडरचा दर बदलला आहे. मुंबईत घरगुती हा गॅस सिलिंडर दर 802.50 रुपये आहे.

५. महाविकास आघाडीचं गेट वे ऑफ इंडियाजवळ फोटोवर जोडो मारत आंदोलन केलं आहे. 

६. दंगली व्हाव्यात असा महाविकास आघाडीचा लोकसभेपूर्वी प्रयत्न होता.