MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Rain Alert : राज्यात पावसााचा जोर पुन्हा वाढणार, वाचा मुंबई ते कोकणातील हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसााचा जोर पुन्हा वाढणार, वाचा मुंबई ते कोकणातील हवामान खात्याचा अंदाज

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याचे चित्र आहे. अशातच गणेशोत्सवाला एक दिवस राहिला असता राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार सरी कोसळणार असल्याचा अंदाज आहे. जाणून घ्या कोकण ते मुंबईमधील पावसाचा अंदाज…

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Aug 26 2025, 08:19 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
गणपतीच्या आगमनाआधी पावसाचा जोर वाढला
Image Credit : ANI

गणपतीच्या आगमनाआधी पावसाचा जोर वाढला

गणपती बाप्पाच्या आगमनाला फक्त एक दिवस उरला असताना राज्यभरात तयारी जोरात सुरू आहे. मात्र त्याआधीच, 26 ऑगस्ट 2025 रोजी कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या महत्त्वाच्या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गणपतीच्या स्वागताच्या तयारीत हवामान अडथळा ठरू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
मुंबईत पावसाचा जोर वाढला
Image Credit : ANI

मुंबईत पावसाचा जोर वाढला

सोमवारपासून मुंबई आणि उपनगर भागात जोरदार पावसाने सुरुवात झाली आहे. यामुळे हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट दिला आहे. सकाळपासून सतत जोरदार सरी कोसळत असून दुपार आणि संध्याकाळी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने प्रवाशांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Related image1
Maharashtra Rain Alert: पावसाचा जोर वाढणार! 17 जिल्ह्यांना यलो अलर्ट, 26 ऑगस्टला मुसळधार पावसाचा इशारा
Related image2
Maharashtra Rain Alert : ऐन गणतीच्या मोक्यावर राज्यात पावसाचा जोर वाढला, रायगड-रत्नागिरीत वादळी वाऱ्याची शक्यता
35
नवी मुंबई आणि ठाण्यात अलर्ट
Image Credit : social media

नवी मुंबई आणि ठाण्यात अलर्ट

मुंबईप्रमाणेच नवी मुंबई व ठाण्यासाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाण्यातील घाटमाथ्याच्या भागात पावसाचा जोर अधिक राहील. तर नवी मुंबईतील खाड्यालगतच्या भागात पाण्याचा निचरा होण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. दुपारनंतर मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

45
पालघर जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह सरी
Image Credit : Getty

पालघर जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह सरी

पालघर जिल्ह्यात आठवड्याची सुरुवातच जोरदार पावसाने झाली आहे. आज येथे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट दिल्यामुळे प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे निर्देश कायम ठेवले गेले आहेत.

55
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील पावसाचा अंदाज
Image Credit : Getty

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील पावसाचा अंदाज

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीत मुसळधार सरींचा अंदाज असून काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील, मात्र काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Operation Tiger | शिवसेनेचे 4 खासदार मातोश्रीवर उपस्थित, तर 5 ऑनलाईन उपस्थित
Recommended image2
Shivsena MP : 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना बळ; ठाकरेंचे इतके खासदार नॉटरिचेबल?
Recommended image3
SHARAD PAWAR : शरद पवार भाजपसोबत जाणार? रामदास आठवलेंची मोठी ऑफर
Recommended image4
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भुजबळांचे सूचक विधान, वाचून म्हणाल हे कस झालं?
Recommended image5
रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस, तब्येत खालावली
Related Stories
Recommended image1
Maharashtra Rain Alert: पावसाचा जोर वाढणार! 17 जिल्ह्यांना यलो अलर्ट, 26 ऑगस्टला मुसळधार पावसाचा इशारा
Recommended image2
Maharashtra Rain Alert : ऐन गणतीच्या मोक्यावर राज्यात पावसाचा जोर वाढला, रायगड-रत्नागिरीत वादळी वाऱ्याची शक्यता
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved