- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather Alert: पाऊस कोसळणार की उन्हाचा तडाखा बसणार?, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचं हवामान!
Maharashtra Weather Alert: पाऊस कोसळणार की उन्हाचा तडाखा बसणार?, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचं हवामान!
Maharashtra Weather Alert: राज्यात ऑक्टोबर हीट वाढताना हवामान विभागाने दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला. मुंबईत ढगाळ वातावरण राहील तर उर्वरित महाराष्ट्रात उष्णता कायम राहणार असून मान्सून परतीच्या मार्गावरय.

पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे
मुंबई: राज्यात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून उष्णतेने जोर पकडला असताना, आता काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता आहे.
Thunderstorm accompanied with lightning, light to moderate rain with gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of South Konkan-Goa, South Madhya Maharashtra.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 9, 2025
हवामानाचा संक्षिप्त आढावा
दक्षिण कोकण
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसासह वादळी वारे (30-40 किमी/ताशी) आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज.
दक्षिण मध्य महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. दुपारी उष्णता अधिक जाणवेल.
मुंबई व उपनगर
आकाश ढगाळ राहणार असून, अधूनमधून हलक्याशा सरी कोसळण्याची शक्यता.
तापमान:
कमाल: 34 अंश सेल्सिअस
किमान: 27 अंश सेल्सिअस
उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा
या भागांमध्ये पावसाचा कोणताही इशारा नाही.
उत्तर महाराष्ट्रात हवामान साफ असून, मराठवाड्यात स्वच्छ सूर्यप्रकाश आणि 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमानाची शक्यता.
पूर्व विदर्भ
गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत अलीकडे जोरदार पाऊस झाला असला तरी, सध्या तिथे उष्णता वाढते आहे.
तापमान पुन्हा 35 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले असून ऑक्टोबर हीट जाणवू लागली आहे.
मान्सूनची परतीची वाट
नैऋत्य मान्सून राज्यातून परतीच्या मार्गावर आहे. काही भागांतून तो माघारी फिरला असला तरी, अजून संपूर्ण महाराष्ट्रातून पूर्णपणे परतलेला नाही. येत्या काही दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सूनची अधिकृत एक्झिट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
काय करावे?
विजांच्या गडगडाटात घरात राहणे सुरक्षित
इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावीत
शेती व अन्य बाह्य कामे थोडा वेळ थांबवावीत
हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवणे गरजेचे

