- Home
- Maharashtra
- Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर हप्त्यासाठी निधी मंजूर, लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी गरजेचं आहे का?
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर हप्त्यासाठी निधी मंजूर, लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी गरजेचं आहे का?
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणारय, यासाठी ४१० कोटींचा निधी मंजूर झाला. या महिन्याच्या हप्त्यासाठी ई-केवायसी अनिवार्य नाही, मात्र नोव्हेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

सप्टेंबरचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यावर जमा होणार
मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी 410 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, या रकमेतून सप्टेंबरचा हप्ता वितरित केला जाणार आहे.
लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी गरजेचं आहे का?
महत्वाचं म्हणजे, अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महिलांनाही या महिन्याचा हप्ता मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, लाभार्थींना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत दिली आहे.
या मुदतीत ई-केवायसी न केल्यास भविष्यातील हप्त्यांसाठी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व महिलांनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
काय आहे ई-केवायसी प्रक्रिया?
या प्रक्रियेमध्ये लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक, तसेच तिच्या पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तपासला जातो. कारण योजनेअंतर्गत केवळ 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिला पात्र ठरतात.
ई-केवायसी केल्यानंतरच खात्रीशीरपणे लाभ मिळत राहील. पुढील काळात ई-केवायसी न केलेल्या महिलांची नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे.
निधी कुठून वर्ग करण्यात आला?
यावेळी सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने 410 कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केले आहेत. यापूर्वीच्या काही हप्त्यांसाठी आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.
कधी जमा होणार हप्ता?
निधीची जुळवाजुळव पूर्ण झाल्यानं, येत्या काही दिवसांत सप्टेंबर महिन्याचा ₹1500 चा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. योजनेचा लाभ घेत असलेल्या लाखो महिलांना याची आतुरतेने वाट आहे.
नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करणं अनिवार्य
ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही, सप्टेंबर महिन्याचा हप्ता सर्वांना मिळणार आहे. पण, नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करणं अनिवार्य आहे, अन्यथा पुढील लाभ थांबवले जाऊ शकतात.

