Asia Cup 2025 IND vs PAK: आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानला 127 धावांत गुंडाळले आणि 16.3 ओव्हर्समध्ये लक्ष्य गाठले.

Asia Cup 2025 IND vs PAK: आशिया कप 2025 चा सर्वाधिक चर्चेत असलेला सामना भारत विरुद्ध पाकिस्तान रविवारी दुबईच्या मैदानावर रंगला आणि हा सामना एकतर्फी ठरला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तानवर 'सर्जिकल स्ट्राइक' करत 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर भारत ग्रुप ‘A’ च्या पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर पोहोचला आहे.

पाकिस्तानची चूक... भारताचा अचूक फटका

टॉस जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने फलंदाजीचा निर्णय घेतला, जो पूर्णतः उलट ठरला. पहिल्याच चेंडूवर विकेट गमावलेल्या पाकिस्तानने पुढे झटपट विकेट्स गमावत 127 धावांवरच समाधान मानावं लागलं.

कुलदीप-अक्षरचा कहर; पाकिस्तानचा डाव उद्ध्वस्त

भारताच्या फिरकीपटूंनी पाकिस्तानला अक्षरशः गुंडाळलं.

कुलदीप यादव – 3 विकेट्स, केवळ 18 धावा

अक्षर पटेल – 2 विकेट्स

बुमराह आणि हार्दिक – सुरुवातीलाच धक्के

वरुण चक्रवर्ती – 1 बळी

फक्त साहिबजादा फरहान (44 चेंडूत 40) आणि शेवटी शाहीन आफ्रिदी (16 चेंडूत 33) यांनी थोडी झुंज दिली. पण बाकीच्या फलंदाजांनी निराशा केली.

भारताचा धडाकेबाज धावांचा पाठलाग

भारताला विजयासाठी फक्त 128 धावांची गरज होती. आणि ती त्यांनी अतिशय आक्रमक पद्धतीने गाठली. अभिषेक शर्मा ने पहिल्या षटकातच चौकार-षटकार लगावले. शुभमन गिल लवकर बाद झाला (10 धावा), पण त्यानंतर आलेल्या तिलक वर्मा (31) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (47 नाबाद) यांनी डाव सावरत विजय जवळ आणला. विजयाचा अंतिम फटका म्हणजे सूर्यकुमार यादवने सुफियान मुकीमच्या चेंडूवर मारलेला षटकार ज्याने क्रिकेटप्रेमींना धोनी स्टाईल फिनिशची आठवण करून दिली.

पॉइंट्स टेबलवर भारत अव्वल

या विजयामुळे भारताने आशिया कप 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि कर्णधारपद सर्वच क्षेत्रात भारत सरस ठरला.

असं राहिलं स्कोअरकार्ड

पाकिस्तान – 127/9 (20 ओव्हर्स)

फरहान – 40, आफ्रिदी – 33

कुलदीप – 3/18, अक्षर – 2/25

भारत – 128/3 (16.3 ओव्हर्स)

सूर्यकुमार – 47*, तिलक – 31, अभिषेक – 24

गिल – 10