MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Foreign Scholarship: परदेशात शिकायचंय पण पैशांची नड? टेन्शन सोडा! राज्य सरकार देतंय 'फॉरेन स्कॉलरशिप'; पाहा पात्रता आणि अर्जाची पद्धत

Foreign Scholarship: परदेशात शिकायचंय पण पैशांची नड? टेन्शन सोडा! राज्य सरकार देतंय 'फॉरेन स्कॉलरशिप'; पाहा पात्रता आणि अर्जाची पद्धत

Foreign Scholarship: राज्य सरकार खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची संधी देत आहे. पदव्युत्तर पदवी, पदविका, पी.एचडी.साठी ही शिष्यवृत्ती असून QS रँकिंगमधील पहिल्या २०० विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Apr 06 2026, 05:54 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
परदेशात शिकायचंय पण पैशांची नड? टेन्शन सोडा! राज्य सरकार देतंय 'फॉरेन स्कॉलरशिप
Image Credit : Getty

परदेशात शिकायचंय पण पैशांची नड? टेन्शन सोडा! राज्य सरकार देतंय 'फॉरेन स्कॉलरशिप

मुंबई: आपल्या मुलाने परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यावं, असं प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं. पण डॉलरचं वाढतं मूल्य आणि परदेशातील शिक्षणाचा अवाढव्य खर्च पाहून अनेकजण पाऊल मागे घेतात. आता मात्र काळजी करण्याची गरज नाही! महाराष्ट्र सरकार खुल्या प्रवर्गातील (General Category) गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणाची सुवर्णसंधी घेऊन आले आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
काय आहे ही सरकारी शिष्यवृत्ती योजना?
Image Credit : Getty

काय आहे ही सरकारी शिष्यवृत्ती योजना?

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या ४ ऑक्टोबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार, आर्थिक अडचणींमुळे परदेशात जाऊ न शकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना सरकार आर्थिक बळ पुरवते. पदव्युत्तर पदवी (Master's), पदव्युत्तर पदविका (PG Diploma) आणि पी.एचडी. (Ph.D.) करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. 

Related Articles

Related image1
New Labour Code : नवीन लेबर कोडचा मोठा निर्णय! आता 1 वर्षातच मिळणार ग्रॅच्युइटी, कर्मचाऱ्यांना दिलासा
Related image2
मराठवाड्यासाठी गुड न्यूज! उन्हाळी सुट्टीत 'दिल्लीवारी' झाली सोपी; नांदेड-संभाजीनगरमार्गे धावणार स्पेशल ट्रेन, पाहा संपूर्ण वेळापत्रक
36
कोणाला मिळणार लाभ? (पात्रता आणि निकष)
Image Credit : stockPhoto

कोणाला मिळणार लाभ? (पात्रता आणि निकष)

राज्य सरकारच्या या योजनेचे काही महत्त्वाचे निकष खालीलप्रमाणे आहेत.

विद्यार्थी संख्या: दरवर्षी एकूण ४० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. (३० पदव्युत्तर आणि १० पी.एचडी. संशोधक).

रँकिंगची अट: विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली परदेशी संस्था QS (Quacquarelli Symonds) रँकिंगमध्ये जगातील पहिल्या २०० संस्थांच्या यादीत असावी.

प्रवर्ग: ही योजना विशेषतः खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आहे. 

46
रशियात वैद्यकीय शिक्षणाची मोठी संधी!
Image Credit : Getty

रशियात वैद्यकीय शिक्षणाची मोठी संधी!

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी या योजनेंतर्गत रशियातील नामांकित वैद्यकीय विद्यापीठांना प्राधान्य दिले जाते. रशियातील पदव्यांना युरोप आणि आशियासह जगभरात मान्यता असल्याने तिथून शिक्षण घेतलेले विद्यार्थी जागतिक स्तरावर करिअर करू शकतात.

महत्त्वाची विद्यापीठे: सेचनोव्ह युनिव्हर्सिटी, आरयूडीएन युनिव्हर्सिटी, पाव्हलोव्ह स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी इत्यादींचा यात समावेश आहे. 

56
अर्ज कुठे आणि कसा करायचा?
Image Credit : Getty

अर्ज कुठे आणि कसा करायचा?

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थी खालील अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरू शकतात.

वेबसाईट:https://fs.maharashtra.gov.in/ 

66
महत्त्वाची टीप
Image Credit : Getty

महत्त्वाची टीप

अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, प्रवेश निश्चितीचे पत्र आणि उत्पन्नाचा दाखला जोडणे अनिवार्य आहे. चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Thane Viral Video : स्वच्छतेचा सल्ला देणाऱ्या वृद्ध व्यक्तीला मारहाण; टॅक्सी चालकाच्या विरोधात FIR दाखल
Recommended image2
Maharashtra Weather Update : कोकणात मुसळधार पाऊस; राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट
Recommended image3
Weather Update : मान्सूनने वेग धरला, महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट!
Recommended image4
Tukaram Mundhe | गुटखा विकणारे आणि खाणारे सावधान, तुकाराम मुंढे यांचा थेट इशारा
Recommended image5
दिल्लीत विद्यार्थ्यांचा एल्गार, 'कॉक्रोच' आंदोलनाच्या वेळी नेमकं काय घडलं?
Related Stories
Recommended image1
New Labour Code : नवीन लेबर कोडचा मोठा निर्णय! आता 1 वर्षातच मिळणार ग्रॅच्युइटी, कर्मचाऱ्यांना दिलासा
Recommended image2
मराठवाड्यासाठी गुड न्यूज! उन्हाळी सुट्टीत 'दिल्लीवारी' झाली सोपी; नांदेड-संभाजीनगरमार्गे धावणार स्पेशल ट्रेन, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved